मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Twitter Review: एव्हरटाईम ब्लॉकबस्टर! नेटकऱ्यांना कसा वाटला ‘पठाण’? वाचा रिव्ह्यू...
Pathaan
Pathaan

Pathaan Twitter Review: एव्हरटाईम ब्लॉकबस्टर! नेटकऱ्यांना कसा वाटला ‘पठाण’? वाचा रिव्ह्यू...

25 January 2023, 12:18 ISTHarshada Bhirvandekar

Pathaan Twitter Review: प्रेक्षकांना शाहरुख खानचा नवा अवतार पाहून खूप आनंद झाला आहे. ट्विटरवर प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल त्यांचे रिव्ह्यू दिले आहेत.

Pathaan Twitter Review: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा बहुप्रतीक्षित ‘पठाण’ हा चित्रपट आज (२५ जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. शाहरुखचा हा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर कल्ला झाला आहे. या चित्रपटाची चर्चा 'बेशरम रंग' या गाण्यापासून झाली होती. शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगनेही आतापर्यंतचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

'पठाण' चित्रपटातून शाहरुख खान चार वर्षांनंतर पडद्यावर परतल्याचा आनंद चाहते साजरा करत आहेत. या स्पाय थ्रिलर चित्रपटातील शाहरुख खानचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांनाही चांगलाच आवडला आहे. यशराज बॅनरखाली बनलेल्या या स्पाय थ्रिलर चित्रपटात शाहरुख खान रॉ एजंट बनला असून, रोमान्स सोडून त्याने यावेळी आपला अॅक्शन अंदाज दाखवला आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा शाहरुख आणि दीपिकाची जोडी दिसली आहे.

अॅडव्हान्स बुकिंगशिवाय हाऊसफुल असताना देखील लोक सकाळपासूनच चित्रपटगृहांमध्ये 'पठाण'च्या तिकिटांसाठी रांगेत उभे असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी दिसले. हा चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांना शाहरुख खानचा नवा अवतार पाहून खूप आनंद झाला आहे. ट्विटरवर प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल त्यांचे रिव्ह्यू दिले आहेत. ट्विटरवर लोक किंग खानचे कौतुक करताना दिसत आहेत.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, 'पठाण हा एक हाय व्होल्टेज अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्याची कथा चांगली आहे. सिद्धार्थ आनंदच्या चित्रपटाकडून अपेक्षा केल्याप्रमाणे चित्रपटाची कथा उत्कृष्ट आहे. शाहरुख खानचा अभिनय जबरदस्त आहे.’. तर, एकाने लिहिले की, ‘हा चित्रपट व्हिज्युअल ट्रीट आहे. शाहरुख खानने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जॉन आणि दीपिका देखील धमाकेदार आहेत. कॅमिओ देखील आश्चर्यकारक आहे आणि क्लायमॅक्स अविश्वसनीय आहे.’

सध्या सगळीकडे ‘पठाण’ची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला करणार आहे. चित्रपटाच्या कथानकासह या चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करेल, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.