Upcoming Movies: ‘पठाण’ ते ‘टायगर ३’; नवीन वर्षात बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झालेत ‘हे’ चित्रपट!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Upcoming Movies: ‘पठाण’ ते ‘टायगर ३’; नवीन वर्षात बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झालेत ‘हे’ चित्रपट!

Upcoming Movies: ‘पठाण’ ते ‘टायगर ३’; नवीन वर्षात बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झालेत ‘हे’ चित्रपट!

Published Dec 19, 2022 12:09 PM IST

Movies Releasing In 2023: येत्या नव्या वर्षात नव्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूडकर सज्ज झाले आहेत. नव्या वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांचे बिग बजेट चित्रपट रिलीज होत आहेत.

Movies Releasing In 2023
Movies Releasing In 2023

Movies Releasing In 2023: सरत्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी आता सगळेच सज्ज झाले आहे. कोरोनानंतर २०२२मध्ये पुन्हा एकदा सगळ्याच क्षेत्रात चांगली कामगिरी पाहायला मिळाली. २०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी फारसं खास गेलं नसलं, तरी येत्या नव्या वर्षात नव्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूडकर सज्ज झाले आहेत. येत्या नव्या वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांचे बिग बजेट चित्रपट रिलीज होत आहेत. नव्या वर्षात शाहरुख खान ते सलमान खान यांसारखे अनेक मातब्बर कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर पाहूया नव्या वर्षात कोणकोणते चित्रपट रिलीज होणार यांची यादी...

पठाण : अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट या वर्षातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ‘पठाण’ हा चित्रपट वादात अडकला असला, तरी चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

शहजादा : अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा ‘शहजादा’ हा चित्रपट देखील नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लुकाछुपी’ या चित्रपटानंतर आता ही जोडी ‘शहजादा’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ला रिलीज होणार आहे.

भोला : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा ‘भोला’ हा चित्रपट देखील या वर्षात रिलीज होणार आहे. ‘भोला’ हा चित्रपट ‘कैथी’ या साऊथ चित्रपटाचा रिमेक असून, २० मार्च २०२३ला रिलीज होणार आहे.

रॉकी और रानी की प्रेमकहानी : अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेला ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

जवान : बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा ‘जवान’ हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

आदिपुरुष : प्रभास आणि क्रिती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून २०२३ला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि सनी सिंह यांच्या देखील मुख्य भूमिका असणार आहेत.

टायगर ३: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट देखील नव्या वर्षात रिलीज होणार आहे. १० नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सॅम बहादूर: अभिनेता विकी कौशल याला ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. हा चित्रपट सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक असून, यात विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

डंकी : शाहरुख खान नव्या वर्षात तीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पठाण’, ‘जवान’नंतर त्याचा ‘डंकी’ हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बडे मियाँ छोटे मियाँ : टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट देखील नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नसली, तरी हा चित्रपट ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज करण्यात येणार आहे.

Whats_app_banner