मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ‘पठाण’साठी कतरिनाने धारण केला ‘झोया’ अवतार; सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाली...
Pathaan
Pathaan

Pathaan: ‘पठाण’साठी कतरिनाने धारण केला ‘झोया’ अवतार; सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाली...

25 January 2023, 10:05 ISTHarshada Bhirvandekar

Pathaan Movie: बहुप्रतीक्षित ‘पठाण’ आज रिलीज झाला आहे. दरम्यान अभिनेत्री कतरिना कैफ हिने देखील एक खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.

Pathaan Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा बहुप्रतीक्षित ‘पठाण’ हा चित्रपट आज (२५ जानेवारी) चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार हवा सुरू आहे. शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सगळे चाहते देखील आतुर झाले होते. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा आज संपली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून या चित्रपटाच्या शोला सुरुवात झाली आहे. दरम्यान अभिनेत्री कतरिना कैफ हिने देखील एक खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान तब्बल ४ वर्षांच्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पठाण’ची क्रेझ पाहता हा चित्रपट लीक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अनेकदा प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडले की, लगेच सोशल मीडियावर व्यक्त होतात. अशावेळी ते चित्रपटातील सस्पेन्स आणि कथानकाचा काही भाग लगेच सांगून टाकतात. यासंदर्भात आता चित्रपटाच्या कास्टसह अभिनेत्री कतरिना कैफ हिने देखील प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.

Katrina Post
Katrina Post

इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत कतरिनाने चाहत्यांना ‘पठाण’साठी खास विनंती केली आहे. तिने चाहत्यांना आपल्या सोशल मीडियावर ‘पठाण’ चित्रपटाचा स्पॉयलर देऊ नका, अशी विनंती केली आहे. यासाठी कतरिना कैफ हिने ‘टायगर’मधील ‘झोया’ अवतार धरण केला आणि प्रेक्षकांना स्पॉयलर देऊ नका असे सांगितले आहे. कतरिनाने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझा मित्र पठाण एका धोकादायक मिशनवर आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही याबाबत काहीही माहिती उघड करू नका. हे अत्यंत महत्त्वाचे मिशन आहे. आता तुम्ही सर्वजण देखील या मिशनचा भाग आहात. झोया.’

सध्या सगळीकडे ‘पठाण’ची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला करणार आहे. चित्रपटाच्या कथानकासह या चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करेल, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.