बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादूकोणचा 'पठाण' हा चित्रपट रिलीज होऊन आत तब्बल ५० पेक्षा अधिक दिवस उलटून गेले आहेत. मात्र आजही सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते. या चित्रपटातील बेशरम रंग गाण्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आता चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने बेशरम रंग गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी का वापरली? यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पठाण चित्रपटातील बेशरंग गाण्यावर वाद सुरु होता. हा वाद या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादूकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे सुरु झाला होता. भगव्या रंगाची बिकिनी वापरल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे आरोप गाण्यावर करण्यात आला होता. आता सिद्धार्थ आनंदने गाण्यात भगव्या रंगाच्या बिकिनीचा वापर का करण्यात आला हे सांगितले आहे.
वाचा: ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘पठाण’, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार
सिद्धार्थ आनंदने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याला भगव्या रंगाची बिकिनी वापरण्यावरुन प्रश्न विचारला गेला. तेव्हा तो म्हणाला, 'आम्ही स्पेनमध्ये होते तेव्हा अचानक रंगाची निवड केली. आम्ही कधीच वेगळा असा काही विचार केला नाही. तो रंग चांगला वाटत होता. शुटिंग करताना बॅकग्राऊंडमध्ये ऊन होते, हिरवे गवत होते. तसेच निळेक्षार पाणी होते. या बॅकग्राऊंडवर भगवा रंग उठून दिसत होता. जेव्हा प्रेक्षक पाहतील तेव्हा त्यांना ते आवडेल आणि आमचा कोणताही वेगळा हेतू नाही हे त्यांना कळेल असा विचार आम्ही केला.'
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा हाय अॅक्शन पॅक्ड चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला दमदार ओपनिंगही मिळाली होती. ‘पठाण’मध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. दीपिका पदुकोणनेही या चित्रपटात अॅक्शन सीन्स केले आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खानही कॅमिओ भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाने जगभरात १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या टप्प्यात १००० कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.
संबंधित बातम्या