- (Pathaan Motion Poster)शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटातील फर्स्ट लूक पाहून चाहते चकित झाले झाले आहेत.
बॉलिवूडचा बादशाह असणारा शाहरुख खान (shahrukh khan)याने नुकतीच इण्डस्ट्रीमधील त्याची ३० वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळेच शाहरुखने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. शाहरुखने नुकतंच त्याच्या आगामी चित्रपट 'पठाण' (pathaan)चा मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे. या गोष्टीची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. प्रदर्शित होताच हा पोस्टर सोशल मीडियावर वाऱ्यासारखं व्हायरल झालं आहे. या पोस्टरमध्ये शाहरुखचा ढासू अंदाज दिसत आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेला शाहरुख आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
या पोस्टरमध्ये शाहरुख एका बाजूला तोंड करून उभा आहे. त्याच्या हातात एक मोठी बंदूक आहे आणि चेहऱ्यावर अनेक जखमा देखील आहेत. बंदूक पकडलेल्या हातात दंडाला एक तावीज बांधलेला आहे. तर त्याच हातात हातकडी देखील आहे. हा पोस्टर शेअर करत शाहरुखने लिहिलं, '३० वर्ष आणि पुढे मोजली नाहीयेत कारण तुमचं प्रेम आणि हसू कायम माझ्यासोबत आहे. पठाण सोबत देखील ते कायम असुद्या. यश राज फिल्म्सचा पठाण येतोय २५ जानेवारीला. चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित होईल.
पठाणचा हा पोस्टर पाहून चाहते चकित झाले आहेत. चाहते अगदी भारावून गेले आहेत. नुकताच शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं होतं. शाहरुख २०२३ साली तीन मोठ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.