मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan IMDb Rating: बॉक्स ऑफिसच नव्हे, आयएमडीबीवरही ‘पठाण’चा जलवा! रेटिंग पाहिलीत का?

Pathaan IMDb Rating: बॉक्स ऑफिसच नव्हे, आयएमडीबीवरही ‘पठाण’चा जलवा! रेटिंग पाहिलीत का?

Jan 26, 2023 09:24 AM IST

Pathaan IMDb Rating: अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला आहे.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

Pathaan IMDb Rating: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर, आयएमडीबीवर देखील या चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर देखील चांगली रेटिंग मिळाली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल ५० कोटींचा व्यवसाय केला असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी आता या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला आहे. चित्रपटातील अॅक्शन सीन्स आणि सलमान खानचा कॅमिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर देखील धमाकेदार रेटिंग मिळाले आहे.

‘पठाण’ला आयएमडीबीवर सरासरी ६.८ रेटिंग मिळाले आहे. ४९.३% लोकांनी या चित्रपटाला १०चे रेटिंग दिले आहे. ५.६% लोकांनी ९ रेट केलेय, तर ३.२% लोकांनी ८ रेट केले आहे. २% लोकांनी ७ रेटिंग दिले आहे. तर, २% लोकांनी २ रेटिंग दिले आहे. ३४.३% लोकांनी या चित्रपटाला १ रेटिंग दिले. आतापर्यंत २१ हजारांहून अधिक लोकांनी या चित्रपटाला रेटिंग दिले आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमर आणि स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. दीपिकाशिवाय जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले. त्याचबरोबर या चित्रपटातील सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहते खूप खूश आहेत. एकीकडे या चित्रपटाला समीक्षक आणि सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कमाई झाली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग