मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Collection: शाहरुख खानच्या ‘पठाण’ची छप्परफाड कमाई; ‘या’ चित्रपटांना मागे टाकणार?

Pathaan Collection: शाहरुख खानच्या ‘पठाण’ची छप्परफाड कमाई; ‘या’ चित्रपटांना मागे टाकणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 13, 2023 01:09 PM IST

Pathaan Box Office Collection : बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Pathaan Box Office Collection
Pathaan Box Office Collection

Pathaan Box Office Collection : बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. नुकतीच या चित्रपटाने ४५० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. येत्या काही दिवसांतच हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. शुक्रवारी या चित्रपटाने ५.९ कोटींची कमाई केली आहे. तर, शनिवार चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप पाहायला मिळाली. आता लवकरच हा चित्रपट आणखी सोन चित्रपटांचे विक्रम मोडीत काढणार आहे.

शनिवारी ‘पठाण’ या चित्रपटाने तब्बल ११.२५ कोटींची कमाई केली आहे. तर, रविवारी देखील या चित्रपटाची चांगली कमाई झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने रविवारी १३ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. या रिपोर्टनुसार ‘पठाण’ चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण ४८९.०५ कोटींची कमाई केली आहे. तर, चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने तब्बल ४७१.२५ कोटींची कमाई केली आहे. हा आकडा केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरील गल्ल्याचा आहे.

परदेशातही ‘पठाण’ थिएटर गाजवत आहे. या चित्रपटाचे वर्ल्डवाईड कलेक्शन देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार’पठाण’ या चित्रपटाने जगभरात तब्बल ९५० कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये काही बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकणार आहे. ‘पठाण’ अद्याप ‘दंगल’ (२००० कोटी), ‘आरआरआर’ (१८१० कोटी), ‘बजरंगी भाईजान’ (९६९ कोटी) आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ (९६६ कोटी) या चित्रपटांच्या तुलनेत मागे आहे.

मात्र, आता काहीच दिवसांत हा चित्रपट वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये १००० कोटींचा टप्पा पार करणार आहे. म्हणजेच हा चित्रपट आता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ (९६९ कोटी) आणि आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ (९६६ कोटी) या चित्रपटांना मागे टाकणार आहे.

WhatsApp channel