मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Collection: बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा धुमाकूळ; पहिल्याच दिवशी चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये?

Pathaan Collection: बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा धुमाकूळ; पहिल्याच दिवशी चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 26, 2023 07:22 AM IST

Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ चित्रपट रिलीज होताच त्याला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद लाभत आहे. अशातच आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा अंदाजे आकडा समोर आला आहे.

Pathaan
Pathaan

Pathaan Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या चित्रपटासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. चित्रपट रिलीज होताच त्याला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद लाभत आहे. अशातच आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा अंदाजे आकडा समोर आला आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमर आणि स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. दीपिकाशिवाय जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले. त्याचबरोबर या चित्रपटातील सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. आता पहिल्याच दिवशी सगळीकडे हा चित्रपट हाऊसफुल ठरल्यानंतर कलेक्शनचे अंदाजे आकडे समोर आले आहेत.

प्रेक्षकांमध्ये ‘पठाण’ची प्रचंड क्रेझ होती. केवळ शाहरुख खानचे चाहतेच नाही, तर सलमान खानचे चाहतेही या चित्रपटाबद्दल उत्सुक होते. ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहते खूप खूश आहेत. एकीकडे या चित्रपटाला समीक्षक आणि सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कमाई झाली आहे. 

कोईमोईच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याच वेळी, केवळ भारतात या चित्रपटाने ५३.२५ कोटींचा गल्ला जमवल्याचे म्हटले जात आहे. ‘पठाण’ चित्रपटाच्या केवळ हिंदी आवृत्तीने ५१.६० कोटींची कमाई केली आहे. सध्या हे केवळ सुरुवातीचे ट्रेंड असून, अजून निश्चित आकडे समोर येणे बाकी आहे. अधिकृत आकडे यापेक्षा किंचित जास्त किंवा कमी असू शकतात.

IPL_Entry_Point