मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: दोन दिवसात ‘पठाण’ची बॉक्स ऑफिसवर जादू, कमावले इतके कोटी

Pathaan: दोन दिवसात ‘पठाण’ची बॉक्स ऑफिसवर जादू, कमावले इतके कोटी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 28, 2023 08:01 AM IST

Pathaan Box Office Collection: दोन दिवसात चित्रपटाने जगभरात केलेल्या कमाईने सर्वजण आवाक झाले आहेत.

पठाण
पठाण (HT)

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा जलवा बॉक्स ऑफिसवर कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पहिल्या दोन दिवसात चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान याने ४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतरही शाहरुखची जादू तसूभरही कमी झालेली नाही.

पठाण चित्रपट हा जगभरात प्रदर्शित झाला आहे. भारतात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जणू काही जादू केली आहे. शाहरुखने दुसऱ्या दिवशीच २० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. विकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. जगभरात पठाण चित्रपटाने २३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच चित्रपटाने २१ नवे रेकॉर्ड केल्याचे समोर आले आहे.
वाचा: इंदूरमध्ये हिंदू संघटनांच्या निषेधानंतर 'पठाण'चा पहिला शो रद्द

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

WhatsApp channel