बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अभिनेत्री दीपिका पादूकोणचा 'पठाण' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होऊन तेरा दिवस झाले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुखने कमबॅक केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
पठाण या चित्रपटाने केजीएफ २ या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. या चित्रपटाने १३व्या दिवशी चित्रपटाने ८५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे पठाणने केजीएफचा रेकॉर्ड मोडल्याचे म्हटले जात आहे. केजीएफ २ने प्रदर्शित होताच जगभरात तुफान कमाई केली होती. आता पठाण देखील त्या पेक्षा जास्त कमाई करताना दिसत आहे.
वाचा: पहिल्यांदाच अलका कुबल आणि निर्मिती सांवत दिसणार 'या' चित्रपटात एकत्र
पठाण चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. चित्रपटाने १२व्या दिवशी जवळपास २८ कोटी रुपये जगभरात कमावले आहेत. दुसऱ्या आठवड्यात शाहरुख बॉक्स ऑफिसवर बादशाह ठरत आहे. वर्ल्डवाइड कलेक्शन हे जवळपास ८५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तेरा दिवसात इतकी कमाई म्हणजेल पठाणने अक्षरश: सर्वांना वेड लावले आहे.
‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.
संबंधित बातम्या