मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Natak: 'पश्चिम रंग पूर्व रूप' नाटक घर बसल्या पाहायचे? जाणून घ्या कधी आणि कुठे

Marathi Natak: 'पश्चिम रंग पूर्व रूप' नाटक घर बसल्या पाहायचे? जाणून घ्या कधी आणि कुठे

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 17, 2024 02:56 PM IST

Marathi Natak On OTT: सध्या प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजन हवे असते. आता घरबसल्या प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाटक पाहायला मिळणार आहे.

Marathi Natak
Marathi Natak

आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेन्ट प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळतो. त्यामुळे ओटीटी हे विश्व प्रेक्षकांसाठी अक्षरश: मनोरंजनाची मेजवानी ठरत आहे. मग तो एखादा हिट चित्रपट असो किंवा मग फ्लॉप चित्रपट असो सर्वकाही ओटीटी वर प्रदर्शित होत असतात. आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांनी घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाटक पाहायला मिळणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले.

'पश्चिम रंग पूर्व रूप' हे नाटक ज्या प्रेक्षकांना रंगभूमीवर पाहायला मिळाले नाही ते आता एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटीवर हे नाटक प्रदर्शित होणार आहे. नाटकाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. मात्र, आता हे नाटक प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार असल्यामुळे सर्वजण आनंदी झाले आहेत. मराठी नाटकांवरचे मराठी माणसाचे प्रेम सर्वश्रुतच आहे. वेगवेगळ्या शैलीच्या नाटकांना मराठी प्रेक्षकांनी नेहमीच स्वीकारले आहे आणि प्रोत्साहनही दिले आहे. त्यामुळे प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मने नाटक प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा: शिवबांची तळपती तलवार, 'बहिर्जी नाईक' यांच्या जीवनावर येणार सिनेमा

'पश्चिम रंग पूर्व रूप' या नृत्य नाट्य संगीतिकेची संकल्पना विद्या जोशी यांची असून याचे दिग्दर्शन श्रीधर जोशी यांनी केले आहे तर लेखन चिन्मय केळकरचे आहे. विजय केंकरेचे मार्गदर्शन लाभलेल्या या नाटकाचे संयोजक व व्यवस्थापक रवि जोशी आहेत. प्रियांका पारेखने मुख्य नृत्य दिग्दर्शिकेची जबाबदारी लीलया सांभाळली. स्नेहा चाफळकर, मंदार पित्रे, संजय सवकूर, नितीन जोशी, सौरभ नेकलीकर, नितीन जोशी, मधुरा साने, कल्पना नेकलीकर, धनंजय काळे, संजय सवकूर, सुनील मुंडले, केतन राईलकर, जयदीप बुझरूक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कलाकृती प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहाता येणार आहे.

WhatsApp channel

विभाग