Parveen Babi Death Anniversary: टाइम मॅगझिनमध्ये झळकणारी पहिली अभिनेत्री परवीन बाबी!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Parveen Babi Death Anniversary: टाइम मॅगझिनमध्ये झळकणारी पहिली अभिनेत्री परवीन बाबी!

Parveen Babi Death Anniversary: टाइम मॅगझिनमध्ये झळकणारी पहिली अभिनेत्री परवीन बाबी!

Published Jan 20, 2024 09:26 AM IST

Parveen Babi Death Anniversary: परवीन बाबी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक असं नाव होतं, जे ७०-८०च्या दशकांत प्रत्येकाच्या ओठावर होतं.

Parveen Babi Death Anniversary
Parveen Babi Death Anniversary

Parveen Babi Death Anniversary: अभिनेत्री परवीन बाबी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक असं नाव होतं, जे ७०-८०च्या दशकांत प्रत्येकाच्या ओठावर होतं. परवीन बाबी यांनी आपल्या अभिनयानेच नाही, तर त्यांच्या सौंदर्यानेही सगळ्यांना वेड लावले होते. २० जानेवारी २००५ रोजी त्यांना या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाला आता १९ वर्षे पूर्ण झाली , असली तरी चित्रपटांच्या माध्यमातून त्या आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. आजही परवीन बाबी यांचे चित्रपट चाहते आवडीने पाहतात. याच निमित्ताने जाणून घेऊया अभिनेत्री परवीन बाबीशी संबंधित काही खास गोष्टी...

अभिनेत्री परवीन बाबी यांचा जन्म ४ एप्रिल १९५४ रोजी जुनागडमध्ये झाला होता. अभिनेत्रीचे वडील मोहम्मद बाबी जुनागढचे नवाब होते. त्यांचे पूर्वज गुजरातचे पठाण होते आणि बाबी राजघराण्याचा एक भाग होते. परवीन बाबी यांचे शालेय शिक्षण अहमदाबादच्या माउंट कार्मेल हायस्कूलमधून झाले होते. यानंतर त्यांनी अहमदाबाद येथून महाविद्यालयीन शिक्षण घेतले, अभिनेत्री परवीन बाबी यांनी इंग्रजी साहित्यात पदवी शिक्षण घेतले होते.

अभिनेत्री परवीन बाबी यांनी १९७२मध्ये मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर १९७३मध्ये त्यांनी चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. मात्र, त्यांचा पहिलाच फ्लॉप झाला होता. यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'मजबूर' हा चित्रपट केला. त्यांचा हा चित्रपट हिट ठरला आणि या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अमिताभ बच्चन, शशी कपूर, धर्मेंद्र, फिरोज खान यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत त्यांनी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. परवीन बाबी यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ८ चित्रपटांमध्ये काम केले होते.

Arun Govil: राम साकारून सन्मान मिळाला पण नुकसान....; ‘रामा’च्या भूमिकेवर पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल!

अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘मजबूर’ या चित्रपटामध्ये झळकल्यानंतर परवीन बाबींनी एक इतिहास रचला. १९७६मध्ये टाइम मासिकाच्या मुखपृष्ठांवर झळकणाऱ्या त्या पहिल्या बॉलिवूड अभिनेत्री ठरल्या. झीनत अमानसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिकेची प्रतिमा बदलण्याचे श्रेय परवीन बाबी यांनाही जाते. त्या त्यांच्याकाळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.

परवीन बाबी यांचे नाव इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते. सुरुवातीला त्याने नाव अभिनेते डॅनी डेन्झोंगपाशी जोडले गेले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात कबीर बेदी आला. बराच काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर महेश भट्ट यांनी परवीन यांच्या आयुष्यात एन्ट्री केली. दोघेही जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. महेश भट्टसोबतच्या नात्यादरम्यान परवीन बाबीला पॅरानोइड स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रासले होते. १९८३मध्ये परवीन बाबी चित्रपट जगतातून अचानक गायब झाल्या. यानंतर त्या १९८९मध्ये मुंबईत परतल्या. दरम्यान त्यांचा आजार बळावला. याच आजारात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाच्या काही दिवसांनंतर त्यांचा मृतदेह घरात आढळला होता.

Whats_app_banner