Parth Bhalerao: पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण, करणार 'या' नाटकाचे दिग्दर्शन-parth bhalerao upcoming natak hum dono aur suit ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Parth Bhalerao: पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण, करणार 'या' नाटकाचे दिग्दर्शन

Parth Bhalerao: पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण, करणार 'या' नाटकाचे दिग्दर्शन

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 10, 2024 08:12 AM IST

Parth Bhalerao Upcoming natak: जाणून घ्या हे नाटक केव्हा आणि कुठे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Parth Bhalerao
Parth Bhalerao

बॉईज या चित्रपटातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे पार्थ भालेराव. त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरते. आता पार्थ त्याच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात करणार आहे. तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पार्थ एका नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे.

केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित 'हम दोनो और सूट' हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणारे हे नाटक रितिका श्रोत्री सादर करणार आहे. आता या नाटकाची चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
वाचा: "आत्मनिर्भर भारत", लक्षद्वीप-मालदीव वादात कंगणा राणौतची उडी

दिग्दर्शनाबद्दल पार्थ भालेराव म्हणतो, "मला ही कथा प्रचंड भावली. १९७०च्या काळातील ही कथा आहे. ही गोष्ट एका अशा कपलची आहे, ज्यांचे नवीनच लग्न झाले आहे, एकमेकांवर प्रेम आहे. तरी बायको नवऱ्याची फसवणूक करत आहे. आता ती असे का करते, हे नवऱ्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते, या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे नाटकात पाहायला मिळणार आहे. नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे हे नाटक असून यात प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. रितिकाने आपल्या अभिनयाने या व्यक्तिरेखेत रंगत आणली आहे. ही एक क्लासिक कलाकृती आहे. याचा पहिला प्रयोग १३ जानेवारी रोजी पुण्यातील दि बॉक्स येथे ९ वाजता होणार आहे.''

रितिका श्रोत्री म्हणते, ''यापूर्वीही मी एकपात्री प्रयोग केला आहे. एका जागी प्रेक्षकांना १ तास खिळवून ठेवणे, हे मोठे कौशल्य आहे आणि ही ताकद कथेमध्ये असते. प्रत्येक क्षणी ही कथा अनपेक्षित वळण घेते. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहाते. आता पुढे काय होणार याची. ही कथाच अतिशय सुंदर आहे.या नाटकात मी पाच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ''