Parineeti Chopra Viral Video Pregnancy Rumors: बी-टाऊनमधून एकामागून एक गुडन्यूज ऐकायला मिळत आहेत. अभिनेत्री यामी गौतम प्रेग्नंट असल्याचे समोर आल्यानंतर रिचा चढ्ढा आणि दीपिका पादुकोण यांनीही आपण आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर आता आणखी एक अभिनेत्री आई होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नुकतेच लग्न झालेली अभिनेत्री परिणीती चोप्रा गर्भवती असल्याचे म्हटले जात आहे. सध्या परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर चाहत्यांना ती प्रेग्नंट असल्याचे वाटू लागले आहे.
नुकतीच परिणीती चोप्रा विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी ती खूप कॅज्युअल लूकमध्ये दिसली. एअरपोर्ट लुकसाठी अभिनेत्रीने डीप नेक लूज ब्लॅक मॅक्सी ड्रेस घातला होता. यावर त्याने डेनिम जॅकेट परिधान केले आणि स्नीकर्स आणि गॉगलने आपला लूक पूर्ण केला होता. मोकळ्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. पण, तिचा हा ड्रेस पाहून लोक असा अंदाज लावू लागले की, परिणीतीने तिचा बेबी बंप लपवण्यासाठी असा लूज ड्रेस घातला आहे. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, परिणीतीचे वजन वाढले असून, कदाचित लग्नानंतर आता ती लगेच गुडन्यूज देणार आहे. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवा पसरवण्याचे कारण ठरला.
या व्हायरल व्हिडीओवर आता अनेकांनी कमेंट्स करत 'परिणिती प्रेग्नंट आहे का?' असा प्रश्न विचारला आहे. ड्रेससोबत तिच्या चालण्यानेही लोकांचे लक्ष वेधून घेतले. विमानतळावर ती स्लो मोशनमध्ये चालताना दिसली. यादरम्यान अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मोठे हास्यही पाहायला मिळाले. पापाराझींना पाहून ती आनंदी दिसत होती. पण आता तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. परिणीती गर्भवती असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पालक होणार असल्याच्या वृत्ताला अद्याप त्यांनी दुजोरा दिलेला नाही. या अफवांवर जोडप्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
परिणीती चोप्राने २०२३मध्ये तिचा बॉयफ्रेंड राघव चढ्ढा याच्यासोबत लग्न केले होते. या दोघांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होती. आता लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच अभिनेत्री गरोदर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. सध्या परिणीती तिच्या व्यावसायिक जीवनातही खूप व्यस्त आहे. अभिनयानंतर त्यांनी गायनातही नशीब आजमावले आणि अनेक लाइव्ह कॉन्सर्ट केल्या आहेत.