
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूड तसेच राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशातच ते दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली. सध्या सोशल मीडियावर परिणितीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राघव चड्ढाचे नाव घेताच परिणिती सर्वांसमोर लाजली असल्याचे दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर परिणिती चोप्राचा एक एअरपोर्ट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये परिणितीने काळ्या रंगाचे ब्लेझर आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या लूकमध्ये परिणिती सुंदर दिसत आहे. एअरपोर्टवर परिणितीचे फोटो काढताना एका फोटोग्राफरने परिणितीला राघव चड्ढाविषयी प्रश्न विचारला. त्यावर परिणितीच्या प्रतिक्रियने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: तिला शोमधून काढायला घाबरत नाही पण...; दयाबेनच्या वापसीवर आसित मोदींचं मोठं विधान
परिणितीला एका फोटोग्राफरने 'सध्या सर्वत्र तुमच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. तुम्ही लग्न करताय हे खरं आहे का?' असा प्रश्न विचारला. त्यावर परिणितीने कोणतेही उत्तर देणे टाळले आहे. राघवचे नाव ऐकताच परिणिती सर्वांसमोर लाजली आणि गाडीत जाऊन बसली.
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. यूकेमध्ये शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली होती. नुकतीच दोघांच्या कुटुंबीयांचीही भेट झाली होती, असं सांगितलं जातं. दोघांचाही लवकरच साखरपुडा होणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकत्र आले होते. याशिवाय डिनरसाठीही ते एकत्र आलेले दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. परिणीती लग्नासाठी कपडे डिझाईन करण्यासाठी आली होती का, असे अनेक प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केले जात होते.
संबंधित बातम्या
