Parineeti Chopra: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा 'अॅनिमल' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून बनलेल्या या चित्रपटाने ९०० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाविषयी फार कमी लोकांना माहिती आहे की, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना आधी परिणीती चोप्राला मुख्य भूमिकेत घ्यायचे होते, पण नंतर जेव्हा तिने ही भूमिका नाकारली तेव्हा दिग्दर्शकाला दुसऱ्या अभिनेत्रीच्या नावाचा विचार करावा लागला. परिणीती चोप्राने स्वत: एका मुलाखतीमध्ये हा चित्रपट का सोडला हे सांगितले आहे.
परिणीती चोप्राने नुकताच 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात रजत शर्माशी बोलताना परिणिती म्हणाली, "सर, खरं सांगायचं तर कदाचित देव माझ्यासाठी काहीतरी चांगलं करत असेल. मी तो चित्रपट करणार होते आणि जवळजवळ सर्व काही ठरले होते. पण त्याच दिवशी मला 'चमकीला' सिनेमाची ऑफर आली. या चित्रपटात मला अनेक गाणी गायला मिळणार होती आणि इतकच नाही तर ए. आर. रहमान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार होती. तसेच इम्तियाज अली यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न होते. मला इतकं काही करायला मिळत होतं की मी अॅनिमल करण्याऐवजी 'चमकीला' सिनेमा करण्याचा निर्णय घेतला."
परिणीती चोप्रा पुढे म्हणाली, 'चमकीलासाठी मला मिळालेले प्रेम, आदर, मान्यता आणि नामांकनाबद्दल मला कोणतीही खंत वाटत नाही." शोमध्ये उपस्थित असलेल्या राघव चड्ढा यांना जेव्हा या निर्णयाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, "सर, मी मनापासून सांगतो अकाऊंटन्सीच्या दृष्टीकोनातून नाही. जर तिने हा सिनेमा साइन केला नसता तर कदाचित आम्ही पंजाबमध्ये भेटलो नसतो, एकत्र वेळ घालवला नसता. कारण चमकीलाचे सर्व चित्रीकरण पंजाबच्या गावात झाले होते."
वाचा: सूरज चव्हाणवर आली सिमेंटच्या गोणी उचलण्याची वेळ, गावात राबतानाचा व्हिडीओ व्हायरल
राघव चड्ढा यांनी सांगितले की, जेव्हा पंजाबमध्ये चमकीलाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा ते आणि परिणीती एकत्र भेटायचे, फिरायला जायचे. इतकंच नाही तर दोघं एकत्र जाऊन गुरुद्वारात नतमस्तक व्हायचे. परिणितीने त्यावेळी अॅनिमलच्या जागी चमकीला करण्याचा निर्णय घेतला नसता तर मला ही संधी मिळाली नसती. दिलजीत दोसांझने 'चमकीला' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्याचे आणि परिणीती चोप्राचे खूप कौतुक झाले होते.
संबंधित बातम्या