Pankaj Tripathi movie: बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता पंकज त्रिपाठीचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'मैं अटल हूं' काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठीने देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये पाहाता आला नाही त्यांना आता घरबसल्या पाहाता येणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले, 'मैं अटल हूं' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'मैं अटल हूँ' हा चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहामध्ये चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता १४ मार्च रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
वाचा: राखी सावंतने बुरख्याच्या आत बिकिनी घातली अन्...; फराह खानने सांगितला मजेशीर किस्सा
'मैं अटल हूं' या चित्रपटात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कथा दाखवण्यात आली आहे. त्यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एक व्यक्ती म्हणून, एक कवी म्हणून, एक मित्र म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचे इतरांशी असलेले संबंध दाखवण्यात आले आहेत. एकंदरीत वाजपेयी यांचा जीवनप्रवास या सिनेमातून उलगघडतो.
वाचा: मलायकाने घटस्फोट का घेतला? किती घेतली पोटगी? जाणून घ्या
पंकज त्रिपाठी चित्रपटाचा जीव आहेत. त्यांचा अभिनय हा कमाल आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणे अतिशय आव्हानात्मक असतानाही पंकज त्रिपाठीने ही जबाबादारी योग्य पद्धतीने पार पाडली आहे. मग अटल यांची कविता असो वा भाषण पंकज त्रिपाठी भूमिका जीवंत करताना दिसतो. तसेच पीयूष मिश्रा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वडिलांची भूमिका योग्य पद्धतीने साकारली आहे.
संबंधित बातम्या