Happy Birthday Pankaj Tripathi: अनेक वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारत आपल्या अभिनयाची भूरळ प्रेक्षकांना घालणारे अभिनेते म्हणजे पंकज त्रिपाठी. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज पंकज त्रिपाठी यांना कोणतीही वेगळी ओळख देण्याची गरज नाही.त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. त्याचबरोबर मागची दोन ते तीन वर्ष पंकज यांनी ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर आपला जबरदस्त जलवा दाखवलेला आहे. परंतु त्यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आतापर्यंत अलिप्तच ठेवलेले होते.
जेव्हा पंकज यांनी रिलेशनशिप आणि त्यांच्या लग्नाचा किस्सा एका शो मध्ये सांगितला होता तेव्हापासून त्यांच्या प्रेमाच्या किस्स्यांची प्रचंड चर्चा होत असते. आज ५ सप्टेंबर रोजी पंकज त्रिपाठी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी...
पंकज यांनीही आपल्या रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे. त्यांनी एका मुलाखतीत याविषयी बोलताना सांगितले होते की 'मी १९९३ मध्ये माझी पत्नी मृदुला यांना भेटलो होतो, तेव्हा पहिल्याच भेटीत आम्हाला प्रेम झाले. त्यानंतर काही काळ आम्हाला भेटता आले नाही. परंतू अखेर आम्ही २००४ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.' लग्नानंतरचा काळ हा पंकज यांच्यासाठी संघर्षाचाच होता कारण तेव्हा पंकज यांना बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी मुंबईत धडपड करावी लागत होती. त्याचवेळी पंकज यांच्याकडे पत्नीसोबत रहायला स्वत:चे घरदेखील नव्हते. त्यावेळी ते पत्नी मृदुला सोबत बॉइज हॉस्टेलमध्ये राहत होते.
मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुले हे फार आरामशीर आणि निवांत राहतात. परंतू पंकज यांची पत्नी सोबत राहत असल्याने ते सभ्यपणे रहायचे. ते हॉस्टेलमध्ये पत्नीसोबत राहत असल्याची बाब एके दिवशी वॉर्डनला कळाली होती. तेव्हा वार्डन त्यांच्याकडे आला आणि 'भाड्याच्या खोलीत तुम्ही कधी शिफ्ट होताय?', असे विचारुन निघून गेला. तेवढ्या वेळासाठी पंकज यांचा जीव टांगणीला लागला होता. पंकज यांच्याकडे आता मुंबईत स्वत:चे आलिशान घर असून त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्तीदेखील आहे. त्याचबरोबर ते चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये भूमिका करण्यासाठी मोठे मानधन घेतात.
वाचा: वन नाईट स्टँडपासून सुरू झाली 'या' कपलची लव्हस्टोरी, अभिनेत्रीने केले आहे शाहरुखसोबत काम
पंकज त्रिपाठी यांनी 'गँग्स ऑफ वासेपूर', 'रावण', 'मसान', 'बरेली की बर्फी', 'न्यूटन', 'स्त्री', 'लुडो', 'मिमी', 'गुंजन सक्सेना', 'शेरदील: द पिलीभीत सागा' आणि 'बच्चन पांडे' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.