Bollywood Actress Viral Video : अनेकदा असे दिसून आले आहे की, स्टार्स आपल्या भूमिकेत येण्यासाठी अशी रूपे अवलंबतात, जी पाहिल्यानंतर त्यांना ओळखणे कुणालाही फार अवघड जाते. दरम्यान, आता बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही असंच काहीसं केलं आहे. नीना यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण, वयाच्या ६५ व्या वर्षी नीना यांनी असे रूप घेतले, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अतिशय सुंदर दिसणाऱ्या नीना गुप्ता यांचा असा भीतीदायक लूक पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की या नीना गुप्ता आहेत.
नीना गुप्ता यांच्या आगामी प्रोजेक्टचा फर्स्ट लूक समोर आला आहे. नुकताच युट्यूब इंडिया इन्स्टाग्राम पेजवर नीना गुप्ता यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नीना गुप्ता एका ‘गंजी चुडैल’च्या अवतारात दिसत आहेत. लाल चमकणारे डोळे, हिरवा चेहरा आणि पूर्णपणे टकली.. नीना यांचा असा लूक पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये नीना सोबत ब्युटी आणि लाइफस्टाइल इनफ्लुएंसर शिवशक्ती सचदेव, इशिता मंगल आणि शक्ती सिधवानी देखील दिसत आहेत. नीनाने तिघींचे अपहरण केले असून, त्यांना दोरीने बांधून ठेवलेले दिसत आहे.
या व्हिडिओच्या सुरुवातीला एक आवाज म्हणतो, 'एकदा तीन युट्यूबर्सचे अपहरण होते. गंजी चुडैलच्या हातून. यानंतर नीना गुप्ता आत शिरतात आणि त्यांचा असा भीतीदायक लूक पाहून तिन्ही मुली घाबरतात. एन्ट्रीसोबतच त्या म्हणतात की, ‘मीम्स बनून मी कंटाळले आहे. आता तुम्ही तिघी मला बेब बनवायल.’ तेव्हा काय होतं ते सांगताच तिन्ही मुली त्यांना स्टायलिश बेब बनवायला सुरुवात करतात. नंतर तिघीजणी गंजी चुडेलला जेन-झी चुडेल बनवण्यासाठी मदत करतात. नंतर नीना यांचा ग्लॅमरस लूक समोर येतो. शेवटी स्वत:चा लूक पाहून नीना लाजतात. हा व्हिडीओ शेअर करत त्या लिहितात की, “याला म्हणतात काहीही पुरावा मागे न ठेवणे #GenZChudail”. नीना यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर आतापर्यंत अनेक कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, 'अरे प्रधानजींच्या बायकोला काय झालं.' दुसऱ्या एकाने लिहिले की,'ती खरंच प्रधानजींची बायको आहे का?'