मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aanchal Tiwari Viral Video: ‘मी जिवंत आहे’! निधनाच्या वृत्तांमुळे हैराण झाली ‘पंचायत २’ फेम आंचल तिवारी

Aanchal Tiwari Viral Video: ‘मी जिवंत आहे’! निधनाच्या वृत्तांमुळे हैराण झाली ‘पंचायत २’ फेम आंचल तिवारी

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 29, 2024 08:34 AM IST

Panchayat Actress Aanchal Tiwari Viral Video: अभिनेत्री आंचल तिवारीने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून आपण जिवंत असल्याचे म्हटले आहे.

Panchayat Actress Aanchal Tiwari Viral Video
Panchayat Actress Aanchal Tiwari Viral Video

Panchayat Actress Aanchal Tiwari Viral Video: नुकत्याच एका रस्ते अपघातात 'पंचायत २ ' फेम अभिनेत्री आंचल तिवारीचे निधन झाल्याचे वृत्त सगळीकडेच प्रसिद्ध झाले होते. २५ फेब्रुवारी रोजी एक भीषण अपघात झाला होता. याच अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. या अपघातात आंचल तिवारी हिचे देखील निधन झाल्याचे म्हटले गेले होते. पण, इथे नावांनी मोठा गोंधळ झाला. या अपघातात ज्या आंचल तिवारीचा मृत्यू झाला, ती आंचल तिवारी ‘पंचायत २’ची अभिनेत्री नव्हती. अपघातात मृत्युमुखी पडलेली आंचल तिवारी ही एक भोजपुरी अभिनेत्री होती. पण, सगळ्यांनाच ती 'पंचायत' अभिनेत्री आंचल तिवारी वाटली. पण आता ही बातमी खोटी ठरली आहे. नुकताच अभिनेत्रीने स्वतः व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत असल्याचे म्हटले आहे.

मी जिवंत आहे : आंचल तिवारी

आता अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून आपण जिवंत असल्याचे म्हटले आहे. या फेक न्यूजमुळे अभिनेत्री आंचल तिवारी खूप वैतागली आहे. आपल्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणाऱ्यांना तिने जाहीरपणे फटकारले आहे. काही मीडिया हाऊसची नावे घेऊन तिने त्यांना गोष्टी नीट तपासून पाहण्याचा सल्लाही दिला आहे. आंचल तिवारी जिवंत असल्याचं लोकांना कळताच, तिची तुलना पूनम पांडेशी होऊ लागली आहे. काहीच दिवसांपूर्वी पूनम पांडे देखील फेक डेथ प्रँक करून बरीच प्रसिद्धी मिळवली होती. तिच्या या पब्लिसिटी स्टंटने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. आता आंचल तिवारीवरही पब्लिसिटी स्टंट केल्याचा आरोप होत आहे.

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; नेमकं काय झालं? वाचा...

अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

आता अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, 'हॅलो, माझे नाव आंचल तिवारी आहे. नुकतीच तुम्ही 'पंचायत २' फेम अभिनेत्री आंचल तिवारीचे निधन झाल्याची बातमी वाचली असेल. मात्र, त्या अपघतात मृत्युमुखी पडलेली आंचल तिवारी दुसरीच कोणीतरी आहे. ती एक भोजपुरी अभिनेत्री आहे. 'पंचायत २'ची आंचल तिवारी म्हणजेच मी तुमच्या समोर आहे. अगदी सुरक्षित आणि सुदृढ आहे. माझ्या मृत्यूची बातमी पूर्णपणे फेक न्यूज आहे. मी सगळ्या न्यूज चॅनेलला सांगू इच्छिते की, काहीही पोस्ट करण्यापूर्वी तुम्ही काय पोस्ट करत आहात याचा एकदा तपास करा. पहिली गोष्ट म्हणजे माझा भोजपुरी सिनेमाशी काहीही संबंध नाही. मी हिंदी सिनेमा करते, मी हिंदी थिएटर केले आहे. त्यामुळे कृपया माझी भोजपुरीशी तुलना करू नका आणि तुम्ही पसरवलेल्या खोट्या बातम्यांमुळे माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना मानसिक त्रास झाला आहे.’

पूनम पांडेशी तुलना झाल्याने अभिनेत्री संतापली!

आन्च्चाल तिवारी पुढे म्हणाले की, 'कृपया लवकरात लवकर ही बातमी काढून टाका. मी पब्लिसिटी स्टंट केल्यासारखे वाटून काही लोक माझी तुलना पूनम पांडेशी करत आहेत. पण मी असे काहीही केलेले नाही. हे मीडियाच्या लोकांनी हे केले आहे. त्यामुळे कृपया लवकरात लवकर ती बातमी काढून टाका.’ आता अभिनेत्री आंचल तिवारी हिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

WhatsApp channel

विभाग