TMKOC : १२ तास काम करून घेतलं, धमक्याही दिल्या! ‘तारक मेहता...’च्या सोनूचे निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC : १२ तास काम करून घेतलं, धमक्याही दिल्या! ‘तारक मेहता...’च्या सोनूचे निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप

TMKOC : १२ तास काम करून घेतलं, धमक्याही दिल्या! ‘तारक मेहता...’च्या सोनूचे निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप

Oct 01, 2024 10:16 AM IST

Palak Sindhwani Accusation : पलकने ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर पुन्हा काही आरोप केले आहेत.मेकर्सनी तिला धमकावले आणि आजारपणातही काम करायला लावल्याचे म्हटले आहे.

Palak Sindhwani Accusation
Palak Sindhwani Accusation

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमागची शुक्लकाष्ट संपतच नाहीत. या मालिकेतील अनेक कलाकारांनी शोचा निरोप घेतला आहे. दरम्यान काही कलाकार या शोच्या मेकर्सवर अनेक आरोप करताना दिसत आहेत.  या मालिकेतील ‘सोनू’ फेम अभिनेत्री पलक सिधवानीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर पुन्हा काही आरोप केले आहेत. पलकने निर्मात्यांवर आरोप करताना म्हटले की, शोच्या निर्मात्याने तिला धमकावले आणि आजारपणातही तिला भरपूर काम करायला लावले. 

मीडियाशी बोलताना पलकने म्हटले की, शोच्या निर्मात्यांनी तिला धमकावले. तिने ज्या ब्रँडसोबत काम केले आणि पैसे मिळवले, त्याचा तपशील देण्यासाठी देखील तिच्यावर दबाव निर्माण करण्यात आला होता.

निर्मात्यांनी पलकला कायदेशीर नोटीस पाठवली!

याबद्दल सांगताना पलक म्हणाली की, ‘त्यांनी मला फक्त धमक्याच दिल्या नाहीत, तर ज्या ब्रँड्ससोबत मी काम केले आणि शूटमधून पैसे कमावले त्यांची नावे सांगण्याची मागणीही केली. हे सगळं बघून मी हैराण झाले, कारण गेल्या ५ वर्षांत माझ्यासोबत असे काहीही घडले नव्हते. आताच हे सगळं घडतंय, कारण मला हा शो सोडायचा आहे. हे सगळं चुकीचं आहे आणि मला हे मान्य नाही. मी काम करत होते, तोपर्यंत त्यांनी मला नोटीस पाठवली नव्हती. मात्र, मी त्यांना घाबरत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी २० सप्टेंबर रोजी कायदेशीर नोटीस पाठवली.’

TMKOC: माझे करिअर उद्ध्वस्त केले! 'तारक मेहता...'मधील सोनूचे निर्मात्यांवर गंभीर आरोप

सलग १२ तास काम करून घेतलं!

अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘मी तिथे ५ वर्षे अतिशय मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने काम केले आहे, म्हणूनच मला त्यांच्याकडून या सगळ्याची अपेक्षा नव्हती. ज्या ईमेल आयडीवर ते मला माझा राजीनामा पाठवण्यास सांगत होते, त्यावरच त्यांनी मला कायदेशीर नोटीस पाठवली होती, ज्यामध्ये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. मला सगळ्या गोष्टींची पूर्तता करता येऊ नये, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक उशीर केला. या ५ वर्षात मी कोणत्याही वादात अडकले नाही किंवा मला कोणतीही कायदेशीर नोटीस मिळाली नाही. मात्र, आता जे घडतंय त्यामुळे मला पॅनिक अटॅक आले.’

बरं नसतानाही सुट्टी दिली नाही!

पलक म्हणाली की, ‘मी तब्येत ठीक नसताना देखील त्यांच्यासाठी शूटिंग करत आहे. मी त्यांना माझे मेडिकल रिपोर्ट्सही दिले. यावेळी मी त्यांना माझी परिस्थिती समजून घेण्याची विनंती केली होती आणि काही दिवसांची रजा मागितली होती. पण, त्यांनी मला सलग १२ तास शूट करायला भाग पाडलं. यामुळे मी कोणालाही भेटू शकले नाही आणि त्यांच्या कायदेशीर नोटीसलाही उत्तर देऊ शकले नाही. मी ‘तारक मेहता…’ सेटवरच अडकले होते. मलाच माहित आहे की, मी ते ६-७ दिवस कसे घालवले. माझा खूप मानसिक छळ झाला आणि हे माझ्यासाठी खूप कठीण दिवस होते. त्यांनी मला सेटवर बोलावून १२ तास बसवले, तर माझे काम फक्त ३० तासांचे होते.’

Whats_app_banner