क्रिकेटपटू स्मृती मानधनाला डेट करतोय ‘हा’ प्रसिद्ध चित्रपट निर्माता, पहिल्यांदाच नात्याचा खुलासा करत म्हणाला...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  क्रिकेटपटू स्मृती मानधनाला डेट करतोय ‘हा’ प्रसिद्ध चित्रपट निर्माता, पहिल्यांदाच नात्याचा खुलासा करत म्हणाला...

क्रिकेटपटू स्मृती मानधनाला डेट करतोय ‘हा’ प्रसिद्ध चित्रपट निर्माता, पहिल्यांदाच नात्याचा खुलासा करत म्हणाला...

Nov 29, 2024 11:54 AM IST

Palaash Muchhal : या वर्षी त्यांच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण होत असताना, पलाश मुच्छाल पहिल्यांदाच स्मृती मानधनाला डेट करण्याबद्दल बोलला आहे.

Palaash Muchhal on relationship with Smriti Mandhana
Palaash Muchhal on relationship with Smriti Mandhana

Palaash Muchhal on relationship with Smriti Mandhana: क्रिकेटर स्मृती मानधना संगीतकार-चित्रपट निर्माते पलाश मुच्छालला डेट करत असल्याच्या अफवा काही दिवसांपासून चर्चेत होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार असणाऱ्या स्मृती हिला महिला प्रीमियर लीगदरम्यान मैदानावर भेटताना पलाशचे  काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु, त्यावेळेस देखील दोघांनी आपल्या नात्यावर मौन राखले होते. मात्र, आता या अफवा खऱ्या ठरल्या आहेत. दोघांच्या नात्याला ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक पोस्ट लिहीत दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. यानंतर आता पहिल्यांदाच पलाश आपल्या नात्यावर मोकळेपणाने बोलला आहे.  

या जोडप्याने त्यांचा नात्याचा पाच वर्षांचा वर्धापन दिन साजरा करताना त्यांचे नाते इंस्टावर अधिकृत केले. हे जोडपे आजवर कधीही सार्वजनिकरित्या एकमेकांबद्दल बोलले नव्हते. मात्र, आता पलाश मुच्छाल यांने स्मृती मानधनाबद्दल पहिल्यांदाच सगळ्यांसमोर खुलासा केला. त्यांचे नाते लोकांच्या नजरेपासून दूर ठेवण्याबद्दल आणि सगळ्या गोष्टी लपवून ठेवण्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘मी सार्वजनिक ठिकाणी खूप लाजाळू आणि अंतर्मुख आहे. लोक यावर विश्वास ठेवत नाहीत.  कारण, माझे बरेच मित्र आहेत आणि मी स्टेजवर देखील असतो. पण जेव्हाही मी कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये मीडियासमोर येतो, तेव्हा मला खूप लाजल्यासारखे वाटते.’

Malaika Arora : अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप होताच मलायका अरोराने दिली गुड न्यूज; मुलानेही दिली साथ!

मला तिचा अभिमान वाटतो!

मात्र, पलाश यावेळी स्मृतीबद्दल आणि तिच्यासोबत असलेल्या या खास नात्याबद्दल भरभरून बोलला आहे. तो म्हणाला की, ‘मला खूप अभिमान वाटतो. साहजिकच वातळच पाहिजे, कारण मी तिचा जोडीदार आहे. तिचा प्रियकर... मला तिच्या यशाचा खूप अभिमान आहे. पण मला माझे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडते. हीच वेळ आहे मी शक्य तितके काम केले पाहिजे.’

पण या वर्षी त्यांचे वैयक्तिक आयुष्य हा जनहिताचा विषय कसा बनला? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की, 'माझ्यासाठी ही खूप अस्वस्थ करणारी परिस्थिती होती. कारण डब्ल्यूपीएल दरम्यान, जेव्हा मी तिला मैदानावर भेटत होतो, तेव्हा मी कॅमेरावर होतो हे मला माहीत नव्हते. मला ते कळलेच नाही, नाहीतर मी ग्राऊंड'वर आलोच नसतो. पण आता जे आहे, ते सर्वत्र आहे. माझ्या शोमध्येही लोक आरसीबी, आरसीबी ओरडत राहतात. पण मी आता सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहे.

Whats_app_banner