मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 28, 2024 10:50 AM IST

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्रीवेडींग सोहळा नुकताच लंडनमध्ये पार पडला. या सोहळ्याला पाकिस्तानी गायक अतिफ असलमने हजेरी लावली असून गाणे देखील गायले आहे.

लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल
लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचा लेक अंनत अंबानी १२ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. तो राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. नुकताच जाम नगरमध्ये त्यांच्या प्रीवेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला जवळपास संपूर्ण बॉलिवूड कलाकारांनी सोबत रिहाना सारख्या हॉलिवूड गायकेने देखील हजेरी लावली होती. आता लंडनमध्ये अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्यांच्या प्रीवेडिंग सोहळ्यातील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गाणे गायले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लंडनमधील स्टोक पार्क इस्टेटमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्रीवेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पाकिस्तानी गायक अतिफ असलमने त्याच्या गाण्याचा जलवा सादर केला. अंबानी यांच्या एका फॅन पेजवर लंडन येथे आयोजित केलेल्या अनंत आणि राधिका यांच्या प्रीवेडिंग सोहळ्यातील अतिफ असलमच्या लाइव कॉन्सर्टमधील फोटो शेअर करण्यात आले आहेत.
वाचा: चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कमल हासन यांच्या लेकीचा ब्रेकअप, काय आहे कारण?

अतिफ असलमने शेअर केले फोटो

अतिफ असलमने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याची पत्नी सारा देखील दिसत आहे. पत्नीने गोल्डन रंगाचा वनपिस परिधान केला आहे. त्यावर डायमंडचा नेकलेस आणि मॅचिंग इअरिंग घातले आहेत. तर अतिफने गोल्डन रंगाचे जॅकेट घातले आहे आणि त्यावर काळ्या रंगाची जीन्स. दोघांचाही ग्लॅमरस लूक पाहण्यासारखा आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
वाचा: ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत

इमरान खानने देखील केले परफॉर्म

पाकिस्तानी गायक इमरान खानने देखील अनंत आणि राधिकाच्या यांच्या प्रीवेडिंग कार्यक्रमात परफॉर्म केले आहे. त्याने 'जो बेवफा', 'एम्पलीफायर', 'आजा वी माहिया' आणि 'सॅटिस्फिया' ही गाणी सादर केली. इमरानने देखील त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. म्हणजेच बॉलिवूडमधील काही कलाकार देखील तेथे उपस्थित होते.
वाचा: 'बाईपण भारी देवा' सिनेमा घरबसल्या पाहायला? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै २०२४ रोजी लंडन येथे आयोजित केला आहे. तसेच दुबईमध्ये त्यांच्या लग्नापूर्वीचे विधी पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

IPL_Entry_Point