Video: ‘पाकिस्तानी लोक भारतीय लष्कराला दहशतवादी मानतात’, अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: ‘पाकिस्तानी लोक भारतीय लष्कराला दहशतवादी मानतात’, अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

Video: ‘पाकिस्तानी लोक भारतीय लष्कराला दहशतवादी मानतात’, अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 26, 2024 08:40 AM IST

Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने 'पाकिस्तानी भारतीय लष्कराला दहशतवादी मानतात' असे म्हटले आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

sai pallavi
sai pallavi

कलाकार हे कायमच त्यांच्या चित्रपटांसोबतच केलेल्या वक्तव्यामुळे ओळखले जातात. सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री साई पल्लवी चर्चेत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तिच्या मुलाखतीचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये साई भारतीय लष्कराबद्दल बोलताना दिसत आहे. पण तिचे हे बोलणे नेटकऱ्यांना पटलेले नाही. त्यांनी साईला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा आपल्या देशाचा अपमान आहे असे म्हणत अनेकांनी साईवर टीका केली आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाली नेमकं साई?

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानूसार, सोशल मीडियावर व्हायरल होणारा साईचा व्हिडीओ हा २०२२ सालचा आहे. व्हिडीओमध्ये साई एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिसत आहे. या मुलाखतीमध्ये, "पाकिस्तानमधील लोकांना वाटते की भारतीय लष्कर ही खरोखरच एक दहशतवादी संघटना आहे. हे त्यांचे विचार आहेत. पण, आपल्या दृष्टीने हा दहशतवाद नाही. अशा प्रकारे लोकांचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे मला हिंसेचा अर्थ समजत नाही" साई असे बोलताना दिसत आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

सोशल मीडियावर साईचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकजण साईवर टीका करत आहेत. 'भारतीय लष्कराने आपल्या लष्कराची तुलना दहशतवादी संघटनांशी करत कधी कोणत्याही देशात घुसखोरी केली आहे का? किंबहुना भारतावर वारंवार हल्ले झाले आहेत. पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमेच्या सुरक्षेची भारताला नेहमीच चिंता नसते का?" असे एका यूजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'रामायणात साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारत आहे हे खूप दु:खद आहे... पाकिस्तानमधील लोक भारतीय लष्कराला दहशतवादी मानतात, असे त्या म्हणत आहेत. ही सर्व हिंदूंसाठी लाजिरवाणी आणि आमच्या श्रद्धेचा अपमान करणारी गोष्ट आहे' अशी कमेंट केली आहे.
वाचा: नगरसेवकाने फसवून केले होते ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, पहिल्या पत्नीने समोर आणले सत्य

साईच्या कामाविषयी

साईच्या कामाविषयी बोलायचे झाले तर लवकरच ती बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत 'रामायण' या चित्रपटात दिसणार आहे. ती या चित्रपटात माँ सीतेची भूमिकेत दिसणार आहे. तसेच तिचा अभिनेता नागा चैतन्यसोबत तांडेल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साई पल्लवीचा आणखी एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे नाव शिवकार्तिकेयन आमरण असे आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या जुन्या व्हिडीओमुळे साईवर टीका केली जात आहे. ती यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहण्यासारखे आहे.

Whats_app_banner