पाकिस्तानी चाहत्याने मीका सिंगला दिले ३ कोटी रुपयांची भेट, नेमकं आहे तरी काय? वाचा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पाकिस्तानी चाहत्याने मीका सिंगला दिले ३ कोटी रुपयांची भेट, नेमकं आहे तरी काय? वाचा

पाकिस्तानी चाहत्याने मीका सिंगला दिले ३ कोटी रुपयांची भेट, नेमकं आहे तरी काय? वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 14, 2024 07:38 PM IST

मीका सिंगला त्याच्या एका चाहत्याने भर स्टेजवर गिफ्ट दिले आहे. या गिफ्टची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊया हे गिफ्ट आहे तरी नेमकं काय?

मीका सिंह
मीका सिंह

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि रॅपर म्हणून मीका सिंग ओळखला जातो. आज त्याचा एक वेगळा चाहता वर्ग असल्याचे पाहायला मिळत आहे. मीकाचे जगभरात चाहते आहेत. मीका इतर गायकांप्रमाणे जगभरात परफॉर्म करुन आपल्या चाहत्यांना भेटताना दिसतो. सध्या त्याच्या एका कॉन्सर्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याला पाकिस्तानी चाहत्याने दिलेल्या गिफ्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे गिफ्ट नेमकं आहे तरी काय चला जाणून घेऊया...

काय आहे व्हिडीओ?

गायक मीका सिंगचे जगभरात चाहते आहेत. नुकताच त्याचा लाइव्ह परफॉर्मन्स अमेरिकेत होता. आता याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक पाकिस्तानी चाहता मिका सिंगला महागडे गिफ्ट देत आहे. या भेटवस्तूंची किंमत कोट्यवधी असल्याचे सांगितले जात आहे. हा चाहता मिकाला पांढऱ्या रंगाची सोन्याची साखळी, घड्याळ आणि अंगठी घालताना दिसत आहे. आता या व्हिडिओवर भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये तू-तू-मैं-मैं होताना दिसत आहे.

चाहत्याने दिले गिफ्ट

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भैय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मीका सिंगचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, 'मिका सिंगने नुकताच बिलोक्सी मध्ये परफॉर्म केला आहे. त्याच्या कट्टर पाकिस्तानी चाहत्याने स्टेजवर येऊन त्याला एक पांढरी सोन्याची चेन, हिऱ्याची अंगठी आणि तीन कोटी रुपये किमतीचे रोलेक्स घड्याळ भेट म्हणून दिले' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: आलियाच्या बॉडीगार्डचं गैरवर्तन, सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला...; व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

लोकांनी केल्या कमेंट

व्हिडीओमध्ये एक चाहता गर्दीतून मीकाकडे चालत येतो. तो मीका सिंग जवळ येतो. त्याला सर्व भेटवस्तू घालतो. त्यानंतर मीका त्याला मिठी मारताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर मीकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये भारत आणि पाकिस्तानचे लोक एकमेकांना भिडताना दिसत आहेत. एकाने कमेंट केली आहे की, त्यांना इतके पैसे कुठून मिळाले. यावर कोणीतरी उत्तर दिले आहे, तिथले सरकार गरीब आहे, जनता नाही. एकाने लिहिलं आहे, तसंही खोटं असेल, मिकाला खरी भेट कोण देणार. एकाने लिहिले की, "जे करत आहे ते जीडीपी कमी होईल." एकाने लिहिले आहे, सरहदने मिकाची विभागणी केली आहे. एका युजरने लिहिले की, 'पाकिस्तानचे चाहते भारतातील सर्व गायकांवर प्रेम करतात.

Whats_app_banner