बॉलिवूड, हॉलिवूड, कोरियन आणि साऊथ इंडियन सिनेमांबरोबरच पाकिस्तानी सिनेमाही स्वत:ला सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी सिनेमाने जगाला अनेक अप्रतिम सिनेमे दिले आहेत. त्यांना आयएमडीबीवर चांगले रेटिंग तर मिळाले आहेच, पण समीक्षकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया आपल्या शेजारच्या देशाने ऑस्करसाठी पाठवलेल्या काही पाकिस्तानी चित्रपटांबद्दल. ऑस्करने या चित्रपटांची एण्ट्री घेतली नसली तरीही मनोरंजन आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून या चित्रपटांकडे पाहता येईल.
या यादीत पहिलं नाव म्हणजे २०२३ साली प्रदर्शित झालेला 'इन फ्लेम्स' हा चित्रपट. चित्रपटाची कथा एका आई मुलीची आहे. घरातील प्रमुखाच्या मृत्यूनंतर आई आणि मुलगी एकमेकांमध्ये आपले धाडस कसे शोधू लागतात. पुरुषी विचारसरणीच्या या जगात त्यांना आता कसे लढावे लागेल. हा चित्रपट आपल्याला केवळ शिकवत नाही तर विचार करायला भाग पाडतो.
'सर्कस ऑफ लाइफ' या नावाने इंग्रजीत प्रदर्शित झालेल्या 'जिंदगी तमाशा' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.६ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट पाकिस्तानातून ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता. पण हा चित्रपट नॉमिनेशनमध्येही येऊ शकला नाही.
'लाल कबूतर' या चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. आयएमडीबीवर या चित्रपटाचे रेटिंग 7.7 आहे आणि कमाल खान दिग्दर्शित हा चित्रपट एका मुलीची कथा आहे. या मुलीच्या पतीची हत्या होते. ती तिच्या पतीच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहे परंतु जेव्हा तिला शहराबाहेर जाण्याचा मार्ग शोधत असलेल्या कॅब ड्रायव्हरची भेट होते तेव्हा तिचे जीवन बदलते.
थ्रिलर आणि ड्रामाने भरलेला 'सावन' हा चित्रपटही तुम्ही बघावा. पोलिओग्रस्त मुलाला त्याच्या वडिलांनी जंगलात मरण्यासाठी सोडले आहे. मग इथून च कथा सुरू होते ती तिच्या आईपर्यंत पोचते आणि आपल्याला विचार करायला भाग पाडेल अशा अनेक गोष्टींची जाणीव होते.
वाचा: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचे खूप कौतुक झाले होते. हा चित्रपट पाकिस्तानातून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. चित्रपटाची कथा एका आधुनिक कवीची आहे ज्याला उर्दू कविता फारशा आवडत नाहीत. मग एके दिवशी तो मीर तकी मीरचे चरित्र वाचायला लागतो ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलते.