बॉलिवूडचे प्रसिद्ध कपल अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. या जोडप्याबद्दल सोशल मीडियावर अफवांना ऊत आला आहे. असे म्हटले जात आहे की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी बिनसल्या आहेत. त्यामुळे या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट एका अभिनेत्रीमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता ही अभिनेत्री कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अबूधाबीमध्ये नुकताच आयफा पुरस्कार सोहळा २०२४ पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला संपूर्ण बच्चन कुटुंबीयांनी एकत्र हजेरी लावली. पण ऐश्वर्या कुठेही दिसत नव्हती. ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबीयांची एण्ट्री झाल्यानंतर आराध्या आणि रेखासोबत येताना दिसली. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आले. आता समोर आलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि ऐश्वर्याचा घटस्फोट हा एका अभिनेत्रीमुळे होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चन हा 'दसवी फेल' या चित्रपटाच्या शुटिंग वेळी अभिनेत्री निम्रत कौरच्या प्रेमात पडला होता. पण आता त्यांचा ब्रेकअप झाला आहे. 'चित्रपट फ्लॉप ठरत असल्यामुळे येणाऱ्या अपयशामुळे अभिषेक खचून गेला होता. त्याचे स्टारडम संपुष्टात येत असल्याचे वाटत होते. त्यामुळे दसवी पास सिनेमाच्या वेळी तो निम्रत कौरच्या प्रेमात पडला. तिच्याशी सतत बोलू लागला. निम्रत ही अभिषेकसोबत असलेल्या नात्यात सीरियस होती. पण अभिषेकला त्याची चूक कळताच त्यांचा ब्रेकअप झाला. पण ऐश्वर्याला जेव्हा याविषयी कळाले तेव्हा त्यांचा घटस्फोट झाला.'
वाचा: दीपिकापेक्षा करीनाने घेतली जास्त फी, वाचा ‘सिंघम अगेन’मधील कलाकारांच्या मानधनाविषयी
ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नयिन सेल्वन २' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता ती पुन्हा कोणत्या चित्रपटात दिसणार याविषयी माहिती समोर आलेली नाही. पण चाहते ऐश्वर्याला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी आतुर आहेत. अभिषेक लवकरच अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या 'बी हॅपी' या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन हे नुकताच प्रदर्शित झालेला 'वेट्टायन' हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रजनीकांत आहेत. सॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने दोन दिवसांत ५५.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या