OTT Top 3 Movies: गतवर्षी अनेक बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. हेच चित्रपट आता ओटीटीवर देखील प्रदर्शित झाले आहेत. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हे चित्रपट ओटीटीवर देखील धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. चला तर बघूया कोणते आहेत हे चित्रपट...
अभिनेता रणबीर कपूर याच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूरचा हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. थिएटरमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर संदीप रेड्डी वंगा यांचा चित्रपट आता ओटीटीवरही प्रचंड व्ह्यूज आणत आहे. चित्रपटाला IMDb वर ६.३ रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
थिएटरनंतर ओटीटीवर धुमाकूळ घातलेल्या चित्रपटांमध्ये प्रभासचा 'सालार' चित्रपट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुपरस्टार प्रभासचा हा चित्रपट ओटीटीवर धमाल करत आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये ७०० कोटींहून अधिक कमाई केली होती. आय डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील या चित्रपटाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दोन मित्रांची ही कहाणी तुम्ही संपूर्ण कुटुंबासह बसून बघू शकता.
ओटीटीवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाला IMDb वर ६.८ रेटिंग मिळाले आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहू शकता. हा चित्रपट आता ओटीटी देखील धुमाकूळ घालत आहे. २०२३मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘डंकी’ या चित्रपटाने नेटफ्लिक्सवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाचे भारतातच नव्हे, तर जगभरात चांगले कलेक्शन झाले होते. या चित्रपटाने ४५० कोटींची कमाई केली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाने आता शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे.
संबंधित बातम्या