OTT Release : ओटीटीवर मिळणार मनोरंजनाचा डबल डोस! 'या' आठवड्यात काय काय रिलीज होणार? पाहा यादी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Release : ओटीटीवर मिळणार मनोरंजनाचा डबल डोस! 'या' आठवड्यात काय काय रिलीज होणार? पाहा यादी

OTT Release : ओटीटीवर मिळणार मनोरंजनाचा डबल डोस! 'या' आठवड्यात काय काय रिलीज होणार? पाहा यादी

Feb 03, 2025 10:44 AM IST

Upcoming OTT Releases : प्रत्येक आठवड्याप्रमाणे फेब्रुवारीचा पहिला आठवडाही मनोरंजन जगतासाठी खूप खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि वेब सीरिजचा पूर येणार आहे.

ओटीटीवर मिळणार मनोरंजनाचा डबल डोस! 'या' आठवड्यात काय काय रिलीज होणार? पाहा यादी
ओटीटीवर मिळणार मनोरंजनाचा डबल डोस! 'या' आठवड्यात काय काय रिलीज होणार? पाहा यादी

OTT Releases This Week : नवीन वर्षाचा म्हणजेच २०२५चा दुसरा महिना फेब्रुवारी सुरू झाला आहे. जानेवारीप्रमाणे हा महिनाही मनोरंजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. विशेषत: फेब्रुवारीचा पहिला आठवडा मनोरंजनासाठी ओटीटीवर हाऊसफुल्ल असणार आहे. कारण, अनेक नवीन चित्रपट आणि सीरिज या आठवड्यात ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ओटीटीवर येणार आहेत. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी घेऊन आलो आहोत , ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन या चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.

कोबाली

प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता रवि प्रकाश अभिनीत तेलुगू वेब सीरिज 'कोबाली' ४ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.या सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा वाढली असून, प्रत्येकजण तिच्या रिलीजची वाट पाहत आहेत. या वेब सीरिजच्या कथेत लोभ आणि बदला दाखवण्यात आला आहे. क्राईम थ्रिलर म्हणून 'कोबाली' धमाकेदार ठरू शकतो.

अनुजा

लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत ऑस्कर नामांकनात स्थान मिळवणाऱ्या 'अनुजा' या शॉर्ट फिल्मचे नाव खूप चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा आणि निर्माते गुनीत मोंगा यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट ५ फेब्रुवारीपासून प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्याची घोषणा निर्मात्यांनी नुकतीच केली आहे.

February OTT Release: ओटीटी प्रेमींसाठी फेब्रुवारी महिना ठरणार खास! बहुप्रतीक्षित सीरिज-चित्रपट होणार रिलीज

मेहता बॉईज

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता बोमन इराणी ‘द मेहता बॉईज’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमात बोमनसोबत अभिनेता अविनाश तिवारी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मेहता बॉईज, वडील आणि मुलाच्या नात्याची भावनिक कथा, या आठवड्यात ७ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

मिसेस

आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाने चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्राच्या 'मिसेस' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची घोषणा काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी केली आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी 'झी ५' या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'द ग्रेट किचन' या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

The Greatest Rivalry- India vs Pakistan

क्रिकेट जगतात भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार टक्कर आहे. आता क्रीडा क्षेत्राव्यतिरिक्त ही टक्कर सिनेमाच्या स्वरात मांडली जाणार आहे. 'The Greatest Rivalry- India vs Pakistan' ही माहितीपट-मालिका ७ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, ज्याची क्रीडा आणि मनोरंजन जगताचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Whats_app_banner