OTT Releases : ओटीटीवर दिसणार क्रिती सेननचा जलवा! या आठवड्यात घरबसल्या काय काय बघता येणार? पाहा यादी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Releases : ओटीटीवर दिसणार क्रिती सेननचा जलवा! या आठवड्यात घरबसल्या काय काय बघता येणार? पाहा यादी

OTT Releases : ओटीटीवर दिसणार क्रिती सेननचा जलवा! या आठवड्यात घरबसल्या काय काय बघता येणार? पाहा यादी

Published Oct 21, 2024 10:28 AM IST

२१ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स, झी ५ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर आपल्या मनोरंजनासाठी बराच नवीन कंटेंट रिलीज होणार आहेत.

Do patti
Do patti

OTT Releases This Week : ऑक्टोबरचा चौथा आठवडा ओटीटी प्रेमींसाठी चांगला असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर दोन नवे सिनेमे, एक नवी वेब सीरिज आणि 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशा तऱ्हेने या आठवड्यात दिवाळीची साफसफाई करून कंटाळा आला असेल, तर आठवड्यात ओटीटीवर या सीरिज आणि चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. २१ ते २७ ऑक्टोबर दरम्यान तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवर काय पाहू शकता, याची यादी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत…

दो पत्ती

'दो पत्ती' हा या आठवड्यातील बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. या चित्रपटात  क्रिती सेनन, काजोल आणि शाहीर शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे 'दो पत्ती' हा क्रिती सेननच्या प्रॉडक्शन हाऊस ब्लू बटरफ्लाय फिल्म्सचा डेब्यू सिनेमा आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

द लीजेंड ऑफ हनुमान ५

'द लीजेंड ऑफ हनुमान'चा पाचवा सीझन ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पाचव्या सीझनमध्ये हनुमान रावणाच्या लंकेला आग लावताना दिसणार आहेत. हा सीझन २५ ऑक्टोबरपासून ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे.

Shammi Kapoor : कुटुंबाच्या विरोधात जाऊन घेतला लग्नाचा निर्णय; शम्मी कपूर पळून मंदिरात गेले पण सिंदुरच विसरले! वाचा…

ऐ जिंदगी

'ऐ जिंदगी' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. झी ५ वर २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात लिव्हर सिरोसिसने ग्रस्त असलेल्या २६ वर्षीय विनयची कहाणी आहे. विनयकडे अवघे सहा महिने असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत विनय यकृत प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतो आणि याच दरम्यान विनयचे रेवती राजनसोबत खूप चांगले संबंध निर्माण होतात.

द ग्रेट इंडियन कपिल

शो कपिल शर्मा शोचा पुढचा भाग २६ ऑक्टोबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो २'च्या या नव्या एपिसोडमध्ये 'दो पत्ती'ची स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

हेलबाउंड : सीझन 2

‘हेलबाउंड’ ही एक कोरियन वेब सीरिज आहे. यात परदेशी रहिवाशांच्या म्हणजेच एलियनच्या गूढ क्षमतांचा शोध घेण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्यामुळे जगात आणखी अराजकता निर्माण होते. हे राक्षस निर्दयपणे आपलं काम करतात आणि लोकांना भयंकर मृत्यूलोकात घेऊन जातात. या सीरिजचा पाचवा भाग २५ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Whats_app_banner