OTT Releases This Week : जानेवारीचा दुसरा आठवडा सिनेरसिकांसाठी अतिशय मनोरंजक असणार आहे. ६ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत नवे चित्रपट आणि वेब सीरिज चित्रपटगृहात तसेच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. एकीकडे सोनू सूदचा 'फतेह' आणि राम चरण आणि कियारा अडवाणीचा 'गेम चेंजर' चित्रपटगृहात धडकणार आहेत. तर, दुसरीकडे ओटीटीवर दोन नवे रिअॅलिटी शो, एक वेब सीरिज आणि एक चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चला एक नजर टाकुया या यादीवर...
अभिनेता विक्रांत मेस्सी याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ‘झी ५’वर रिलीज होणार आहे. हा चित्रपट १० जानेवारीला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा, बरखा सिंग आणि नाजनीन पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये २७ फेब्रुवारी २००२ रोजी सकाळी घडलेल्या सत्य घटनेवर या चित्रपटाची कथा केंद्रित आहे.
'ब्लॅक वॉरंट' ही वेब सीरिज १० जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज 'ब्लॅक वॉरंट' नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तुरुंग अधिकाऱ्याची कथा यात दाखवण्यात आली आहे. या मालिकेत जहान कपूर, राहुल भट, परमवीर चीमा, अनुराग ठाकूर आणि राजश्री देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Mufasa The Lion King : 'मुफासा द लायन किंग' आता ओटीटीवर बघता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या
बिझनेस रिअॅलिटी शो 'शार्क टँक इंडिया' त्याच्या नवीन सीझनसह परतला आहे. या सीझनमध्ये अमन गुप्ता, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनिता सिंह आणि पियुष बन्सल यांच्यासह स्नॅपडील आणि टायटन कॅपिटलचे सहसंस्थापक कुणाल बहल आणि वीबा/व्हीआरबी कन्झ्युमरचे संस्थापक विराज बहल सहभागी होणार आहेत. या शोचा पहिला एपिसोड ६ जानेवारीला सोनी लिव्हवर प्रसारित झाला आहे.
'एमटीव्ही रोडीज एक्सएक्स'मध्ये गँग लीडर नेहा धुपिया, रिया चक्रवर्ती, प्रिन्स नरुला आणि एल्विश यादव दिसणार आहेत. ११ जानेवारी २०२५ रोजी एमटीव्हीवर याचा प्रीमियर होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म जिओसिनेमावर तुम्ही पाहू शकता.
'ब्रेकथ्रू' ही सीरिज पीटर एगर्स आणि मॅटियास नॉर्डक्विस्ट यांच्या नॉन-फिक्शन पुस्तकावर आधारित आहे, ज्यामध्ये एक धक्कादायक दुहेरी हत्या प्रकरण १६ वर्षे अनुत्तरीत राहिल्याचे दाखवण्यात आले आहे. एक गुप्तहेर आणि एक कुटुंब सत्य शोधण्यासाठी एकत्र येतात, चार भागांची मालिका खूपच धमाकेदार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर ७ जानेवारीला प्रदर्शित झाली.
संबंधित बातम्या