मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Releases: ‘बिग बॉस’, ‘कोटा फॅक्टरी’ ते ‘बॅड कॉप’; या आठवड्यात ओटीटीवर काय काय पाहायला मिळणार?

OTT Releases: ‘बिग बॉस’, ‘कोटा फॅक्टरी’ ते ‘बॅड कॉप’; या आठवड्यात ओटीटीवर काय काय पाहायला मिळणार?

Jun 24, 2024 05:48 PM IST

OTT Releases This Week: ओटीटीवर या आठवड्यात प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांच्या नवीन सीझनपासून ते फ्रेश रिलीजपर्यंत मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

OTT releases this week
OTT releases this week

OTT Releases This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. यावेळी अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन होस्ट करत आहे. तर जेरेमी अॅलन व्हाईटचा द बेअर', ते ‘कोटा फॅक्टरी’ आणि ‘बॅड कॉप’ अशा अनेक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चला पाहूया ही यादी…

अरणमनई ४ (डिस्ने + हॉटस्टार)

ट्रेंडिंग न्यूज

सुंदर सी यांच्या तमिळ हॉरर फ्रँचायझी ‘अरणमनई’चा चौथा भाग २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आपल्या बहिणीच्या गूढ मृत्यूमागचं सत्य उलगडण्यासाठी कुठल्याही थराला जायला तयार असलेल्या एका मध्यमवयीन माणसाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. सुंदर, तमन्ना भाटिया, राशी खन्ना आणि योगी बाबू या चित्रपटात दिसणार आहेत.

बिग बॉस ओटीटी सीझन ३ (जिओ सिनेमा)

टीव्हीवरील ‘बिग बॉस’चा स्पिन-ऑफ असलेल्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या सीझनमध्ये अनिल कपूर सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहे. २१ जूनपासून सुरू झालेल्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी, इन्फ्लुएंसर आणि टीव्ही सेलिब्रिटी स्पर्धा करताना दिसणार आहेत.

२१ जूनपासून सुरू होणाऱ्या 'बॅड कॉप' या सीरिजमध्ये करण नावाच्या नैतिकदृष्ट्या अस्पष्ट पोलिस अधिकाऱ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कब्झ नावाचा खलनायक त्याला एकापेक्षा अधिक प्रकारे आव्हान देतो, तेव्हा तो स्वतः देखील एका जीवघेण्या परिस्थितीत सापडतो. करणला लवकरच वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या त्याचे आयुष्य दु:खद होत असल्याची जाणीव होते. अनुराग कश्यप, गुलशन देवय्या, हरलीन सेठी आणि अनुपम के. सिन्हा यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

कोटा फॅक्टरी सीझन 3 (नेटफ्लिक्स)

टीव्हीएफच्या कोटा फॅक्टरीचा तिसरा सीझन २० जूनपासून सुरू होत आहे. राजस्थानमधील कोटा येथे आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना वैभव आणि त्याच्या मित्रांचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. मॉक टेस्टमधील कामगिरीमुळे वैभवची चिंता वाढली आहे, तर जीतू भैय्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मयूर मोरे आणि जितेंद्र कुमार यांनी आपल्या भूमिका साकारल्या आहेत.

‘द बेअर’ २१ जून रोजी एक नवीन सीझन घेऊन परत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीझनमध्ये कार्मी आपल्या सँडविचच्या दुकानाचे उच्च-स्तरीय डायनिंग हॉटेलमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करतो. मिशेलिन स्टारसाठी झटताना त्याला आणि त्याच्या टीमला रेस्टॉरंट इंडस्ट्रीच्या चढ-उतारांना सामोरे जावे लागते. या सीझनमध्ये कार्मीच्या वैयक्तिक आयुष्यावरही लक्ष केंद्रित केले जाईल, जेरेमी अॅलन व्हाईट त्याच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे.

ट्रिगर वॉर्निंग (नेटफ्लिक्स)

२१ जूनपासून सुरू होणाऱ्या या अॅक्शन थ्रिलरमध्ये जेसिका ‘अल्बा पार्कर’ नावाच्या स्पेशल फोर्सकमांडोची भूमिका साकारत आहे. वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर आपल्या मूळ गावी जाऊन बारची जबाबदारी घेण्यास भाग पाडलेल्या तिला शहरात दहशत माजवणाऱ्या आणि एका कटाचा पर्दाफाश करणाऱ्या हिंसक टोळीचा सामना करावा लागतो. मॉली सूर्या दिग्दर्शित ‘ट्रिगर वॉर्निंग’मध्ये अँथनी मायकेल हॉल, मार्क वेबर आणि जॅक वेरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

WhatsApp channel