मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Releases: ओटीटीवर होणार धमाका! ‘महारानी ३’ ते ‘हनुमान’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा यादी

OTT Releases: ओटीटीवर होणार धमाका! ‘महारानी ३’ ते ‘हनुमान’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा यादी

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 05, 2024 12:00 PM IST

OTT Releases Of This Week: या आठवड्यात काही बहुचर्चित वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत. या विकेंडला तुम्हीही घरी बसून बिंज वॉचचा प्लॅन करत असाल, तर ही यादी खास तुमच्यासाठी...

OTT Releases Of This Week
OTT Releases Of This Week

OTT Releases Of This Week: ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या मनोरंजनाचा खजिना झाले आहेत. दररोज ओटीटी माध्यमांवर काही ना काही नवीन धमाकेदार कंटेंट पाहायला मिळत असतो. आता या आठवड्यात देखील काही बहुचर्चित वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत. या विकेंडला तुम्हीही घरी बसून बिंज वॉचचा प्लॅन करत असाल, तर ही यादी खास तुमच्यासाठी...

महारानी ३

अभिनेत्री हुमा कुरेशीने 'महाराणी ३' या तिच्या लोकप्रिय सीरिजचा ट्रेलर रिलीज केल्यानंतर चाहते आणि प्रेक्षक तिच्या या सीरिजच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरिजचे पहिले दोन्ही सीझन खूप हिट ठरले होते. ही सीरिज बिहारच्या राजकीय पार्श्वभूमीवर आधारित आहे. या मालिकेत हुमा कुरेशी, अमित सियाल, विनीत कुमार, प्रमोद पाठक आणि सोहम शाह मुख्य भूमिकेत आहेत. ‘महारानी सीझन ३’ येत्या ७ तारखेला सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.

शोटाईम

'शोटाईम' या सीरिज बद्दल लोकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. मिहिर देसाई दिग्दर्शित या सीरिजमध्ये इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, मौनी रॉय, राजीव खंडेवाल, श्रिया सरन, विजय राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज ८ मार्च रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

Aamir Khan News: १६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसले आमिर खान-दर्शिल सफारी! नव्या लूकने चाहतेही झाले हैराण

हनुमान

थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘हनुमान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. 'हनुमान' हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात तेजा सज्जा मुख्य भूमिकेत दिसला आहे. ८ मार्चला हा चित्रपट ‘झी ५’वर रिलीज होणार आहे.

लाल सलाम

रजनीकांत स्टारर तमिळ चित्रपट 'लाल सलाम' देखील या आठवड्यात घर बसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘लाल सलाम’ हा चित्रपट ऐश्वर्या रजनीकांतने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. आता ८ मार्चला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

मेरी ख्रिसमस

श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना कैफ आणि विजय सेतुपती मुख्य भूमिका असलेला ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रहस्यमय कथा दोन अनोळखी व्यक्तींभोवती फिरणारी आहे. हा चित्रपट ८ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग