मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Release: फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी! धमाल चित्रपट-सीरिज होणार रिलीज

OTT Release: फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी! धमाल चित्रपट-सीरिज होणार रिलीज

Feb 01, 2024 09:08 PM IST

OTT Releases In February 2024: या महिन्यात प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिलर, रोमान्स आणि ॲक्शनचा डोस घरबसल्या मिळणार आहे.

OTT Releases In February 2024
OTT Releases In February 2024

OTT Releases In February 2024: फेब्रुवारी महिन्यात अनेक वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असून, प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या महिन्यात प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिलर, रोमान्स आणि ॲक्शनचा डोस घरबसल्या मिळणार आहे. यासोबतच या महिन्यात काही थ्रिलर चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होतील, कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील ते जाणून घेऊया...

आर्या ३: द लास्ट बॅटल

अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनित वेब सीरिज ‘आर्या’चे दोन्ही सीझन प्रेक्षकांना खूप आवडले होते. आता चाहते ९ फेब्रुवारीला या सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या क्लायमॅक्सची वाट पाहत आहेत. या सीझनमध्ये ‘आर्या’ शत्रूंवर शेवटचा वार करणार आहे. सुष्मिता सेनची ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

लंटराणी

‘पंचायत’ फेम अभिनेता जितेंद्र कुमार आणखी एक धमाकेदार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लंटराणी’मध्ये तो जॉनी लीव्हरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘लंटराणी: टॉल टेल्स’ हा चित्रपट ९ फेब्रुवारीला ‘झी ५’वर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kiran Gaikwad: डॉक्टर अन् डिम्पीचं खऱ्या आयुष्यातही जुळलं? ‘त्या’ पोस्टनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

खिचडी २

जर, तुम्ही देखील थ्रिलर आणि सस्पेन्स सीरिज आणि चित्रपट बघून तुम्ही कंटाळला असाल आणि एखाद्या धमाल विनोदी चित्रपटाच्या शोधात असाल, तर तुमची ही प्रतीक्षा येत्या ९ फेब्रुवारीला संपणार आहे. पुन्हा एकदा दमदार स्टारकास्ट घेऊन 'खिचडी २' हा चित्रपट तुम्हा सर्वांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘खिचडी २’ हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी ‘झी५’वर रिलीज होणार आहे.

भक्षक

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा 'भक्षक' हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्यासोबत आदित्य श्रीवास्तव आणि संजय मिश्रा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यामध्ये भूमी पेडणेकर पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

द इंद्राणी मुखर्जी: स्टोरी बिहाईंड द ट्रुथ

आयएनएक्स मीडियाची माजी सीईओ इंद्राणी मुखर्जी हे प्रकरण आजही सगळ्यांना लख्ख आठवत आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली होती. याच प्रकरणावरील माहितीपट २३ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या माहितीपटातून पुन्हा एकदा या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

WhatsApp channel