सिनेरसिकांसाठी हा आठवडा उत्तम जाणार आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्सवर उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्सवर तुम्हाला हॉररपासून कॉमेडी पासून डॉक्युसीरिजपर्यंत सर्व काही पाहायला मिळणार आहे. या यादीमध्ये द ग्रेट इंडियन कपिल शो देखीस समावेश आहे. कपिल शर्मा शोचे दुसऱ्या सीझनसह नेटफ्लिक्सवर पुनरागमन होणार आहे. या शोविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहाया मिळते. चला जाणून घेऊया या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे शो...
मॉन्स्टर : द स्टोरी ऑफ लायल अँड एरिक मेनेंडेज : ही वेब सीरिज सत्य घटनेवर आधारित वेब सीरिज असणार आहे. ही सीरिज १९८९ मध्ये आई-वडिलांची हत्या करणाऱ्या मेनेंडेझ बंधूंच्या जीवनावर आधारित आहे. ही मालिका १९ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
हिज थ्री डॉटर्स: या वेब सीरिजमध्ये आपल्याला न्यूयॉर्कमध्ये आजारी वडिलांना भेटायला येणाऱ्या तीन विभक्त बहिणींची कहाणी पाहायला मिळणार आहे. ही वेब सीरिज शुक्रवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ही कहाणी तुम्हाला नक्कीच भावूक करेल. त्यामुळे ही सीरिज नक्की पाहा...
'द ग्रेट इंडियन कपिल शो' सिझन २: 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता हा शो २१ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. यावेळी या शोमध्ये पाहुणे म्हणून आलिया भट्ट, देवरा पार्ट १ची कास्ट आणि भारतीय क्रिकेट टीमचे सदस्य दिसणार आहेत.
व्हॉट नेक्सट? द फ्यूचर विद बिल गेट्स : व्हॉट नेक्सट? द फ्यूचर विद बिल गेट्स ही डॉक्युमेंटरी सीरिज असणार आहे. यात बिल गेट्स भविष्याविषयी बोलताना दिसणार आहेत. एआयपासून ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत सर्व गोष्टींवर बिल गेट्स आपले मत मांडताना दिसतील.
इविल डेड राईज : हा एक अमेरिकन हॉरर चित्रपट आहे जो या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शनिवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?
या चित्रपट आणि मालिकांव्यतिरिक्त टायलर हेन्री (१८ सप्टेंबर), ग्रेव्ह टॉर्चर (१६ सप्टेंबर), फास्ट अँड फ्युरियस एक्स (१८ सप्टेंबर) आणि अनसंग हिरो (१६ सप्टेंबर) हे चित्रपट आणि मालिका या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत.