आज काल प्रेक्षकांचा घर बसल्या काही नवे चित्रपट आणि सिरीज पाहण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे विकेंडला कोणत्या नव्या सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होतात हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता या आठवड्यात कोणत्या नव्या सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा...
'शांतीत क्रांती २' ही मराठी वेब सीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये अभय महाजन, ललित प्रभाकर आणि अलोक राजवाडे या तीन धमाल मित्रांची कथा पाहायला मिळणार आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Shantit Kranti 2 Review : तीर्थ यात्रेवरून थेट बॅचलर पार्टी! 'शांतीत क्रांती २'चा भन्नाट प्रवास
फ्रेंच वेब सीरिज 'लुपॉन'चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये अर्सान डियॉप हा त्याच्या आईला शोधून काढतो आणि 'मॅने' नावाचे पेंटिंग चोरी करुन कोट्याधीश बनतो. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
हॉलिवूडमधील लोकप्रिय सीरिजमधील एक सीरिज म्हणजे 'सेक्स एज्युकेशन.' या सीरिजचा शेवटचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये ओटिस आणि मेव यांची कथा दाखवण्यात येणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
अमायरा दस्तूर, अविनाश तिवारी, कृतिका कामरा, के के मेनेन यांच्या मुख्य भूमिका असणारी 'बंबई मेरी जान' ही सीरिज नुकताच अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. विकेंडसाठी ही सीरिज योग्य पर्याय ठरु शकतो.