ऑगस्ट महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये हॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांचा देखील समोवेश आहे. पण जर हेच चित्रपट मराठीमध्ये पाहायला मिळाले तर मनोरंजनाची मेजवानीच म्हणावी लागेल. आता तुमची ही इच्छा देखील पूर्ण होणार आहे. हॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपट मराठीमध्ये पाहायला मिळणार आहेत तेही घर बसल्या. चला जाणून घेऊया कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
ऑगस्ट महिन्यात अल्ट्रा झकास मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थ्रिल आणि ॲक्शनने भरलेले चित्रपट येत आहेत, जे तुम्ही तुमच्या मित्र परिवार आणि कुटुंबासोबत पाहू शकता. साऊथचा समारा पासून ते हॉलीवुडचा लाय बाओ पर्यंत, प्रत्येक शुक्रवारी नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणते नवे चित्रपट प्रदर्शित होणार तेही जाणून घेऊया...
नराधम हा चित्रपट मल्याळम चित्रपट 'सामारा'चे मराठी व्हर्जन आहे. हा चित्रपट ०२ ऑगस्ट २०२४ रोजी अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक चार्ल्स जोसेफ यांनी केले आहे. या चित्रपटात अँथनी नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची कथा दाखवण्यात आली आहे. हा पोलीस अधिकारी एका बर्फाळ भागात रहस्यमय विषाणूच्या प्रादुर्भावाचा तपास घेत आहे.
'डाक’ हा एक भयपट आणि सस्पेन्स थ्रिलर आहे. या चित्रपटात गावात राहणारा गोपाळ आत्महत्या करतो. गोपाळच्या मृत्यू संदर्भात तपास सुरू करण्यासाठी गावात काही अधिकारी पोहोचतात. गोपाळने खरंच आत्महत्या केली कि त्याची आत्महत्या घडवून आणली? ही कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखक महेश नेने यांनी केले आहे. चित्रपटात अश्विनी काळसेकर, अनिकेत केळकर आणि संजीवनी जाधव यांच्या अप्रतिम भूमिका आहेत. हा चित्रपट ०९ ऑगस्ट २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
‘फ्लेश वूंड’ हा हॉलिवूडमधील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट १६ ऑगस्ट २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर मराठीत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात एल.टी. टायलर आणि त्यांच्या टीमला चोवीस तासांच्या आत बेपत्ता झालेल्या शास्त्रज्ञांच्या गटाचा तपास करण्याचा आदेश दिला आहे जे टॉप-सिक्रेट मिशनवर काम करत असतात ही कथा दाखवण्यात आली आहे.
आता प्रेक्षकांना कन्नडचा 'चेज' या चित्रपटाचा आनंद मराठीत घेता येईल जो २३ ऑगस्ट २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेत्रहीन माजी पोलीस अधिकारी निधीला एका अनोळखी माणसाची मदत घेऊन घरी जात असताना एका अनपेक्षित अपघाताचा अनुभव येतो. ती पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी जाते तेव्हा सीसीबी अधिकारी अविनाश या प्रकरणाची जबाबदारी घेतात. ही केस निधी आणि अधिकारी, दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारे अनपेक्षित वळण घेऊन येते.
वाचा: 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी
हॉलिवूड चित्रपट ‘लाय बाओ’ म्हणजेच मराठीमध्ये शक्तिशाली. हा चित्रपट ३० ऑगस्ट २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात टॅम या कॉमिक कलाकाराची कथा दाखवण्यात आली आहे. त्याला एक गंभीर आजार झालेला असतो. जगण्याच्या हताशपणात, टॅम वैद्यकीय उपचार घेण्यास सहमत होतो आणि उपचारानंतर, त्याला अलौकिक शक्ती प्राप्त होते.