मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा प्रेक्षकांसाठी खूप मनोरंजक असणार आहे. घरीच बसून मनोरंजनाचा आनंद घेणाऱ्या लोकांसाठी या आठड्यात अनेक नव्या सीरिज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहेत. होळीच्या जल्लोषानंतर, जर तुम्हीही तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह मिळून काही मनोरंजक चित्रपट आणि सीरिज पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर हा आठवडा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या सीरिज आणि चित्रपट तुमचा संपूर्ण विकेंड मनोरंजनाने भरून टाकतील. चला या यादीवर एक नजर टाकूया...
मार्चच्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात एका कॉमेडी शोने होणार आहे. कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा त्याच्या संपूर्ण टीमसह पडद्यावर परतत आहे. यावेळी कपिल टीव्हीवर नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर धमाका करणार आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' येत्या ३० मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा या शोमध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील मजेदार धमाल पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा आगामी चित्रपट 'पटना शुक्ला' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. रवी किशनच्या 'ममला लीगल है' नंतर पुन्हा एकदा या चित्रपटात कोर्टरूमभोवती आधारित कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वास्तविक, हा चित्रपट हजेरी क्रमांकाशी संबंधित शिक्षण घोटाळ्यावर आधारित आहे.
स्पोर्ट्स ड्रामावर आधारित 'द ब्यूटीफुल गेम' ही वेब सीरिज आता रिलीजसाठी सज्ज झाली आहे. तुम्हीही स्पोर्ट्सप्रेमी असाल, तर ही सीरिज तुम्ही २९ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
हॉरर आणि क्राईम वेब सीरिज पाहण्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी 'इन्स्पेक्टर ऋषी' ही सीरिज रिलीज होत आहे. ही सीरिज २९ मार्च रोजी प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम केली जाणार आहे. या वेब सीरिजमध्ये नवीन चंद्र मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही वेब सीरिज तामिळ, तेलुगू, हिंदी आणि इतर दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित 'लाल सलाम' हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. आता हा चित्रपट २९ मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विष्णू विशाल, विक्रांत आणि सेंथिल मुख्य भूमिकेत आहेत.
प्रभू राम व्यास लिखित आणि दिग्दर्शित 'लवर' चित्रपटात के. मणिकंदन आणि श्रीगौरी प्रिया मुख्य भूमिकेत दिसले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर २७ मार्च रोजी रिलीज होणार आहे.