मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Release: मर्डर, सस्पेन्स आणि कॉमेडी… ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची रोलरकोस्टर राईड! पाहा रिलीजची यादी

OTT Release: मर्डर, सस्पेन्स आणि कॉमेडी… ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची रोलरकोस्टर राईड! पाहा रिलीजची यादी

Mar 13, 2024 09:19 AM IST

OTT Release This Week: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांच्या यादीमध्ये मर्डर, सस्पेन्स आणि कॉमेडी यांसारख्या सगळ्याच प्रकारचा कंटेंट पाहायला मिळणार आहे.

OTT Release This Week
OTT Release This Week

OTT Release This Week: घरी बसून मनोरंजनाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी यंदाचा आठवडा खूप खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांची यादी आता समोर आली आहे. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांच्या यादीमध्ये खून, सस्पेन्स आणि कॉमेडी यांसारख्या सगळ्याच प्रकारचा कंटेंट पाहायला मिळणार आहे. चला तर बघूया या आठवड्यात कोणकोणते चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीज होत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मर्डर मुबारक

नेटफ्लिक्सची वेब सीरिज 'मर्डर मुबारक' ही रॉयल दिल्ली क्लबमध्ये झालेल्या हत्येच्या तपासावर आधारित आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘मर्डर मुबारक’ ही सीरिज येत्या १५ मार्चला रिलीज होणार आहे.

Pulkit Samrat Affairs: सलमान खानची बहिणच नाही, तर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय पुलकित सम्राटचं नाव!

बिग गर्ल्स डोंट क्राय

पूजा भट्टची 'बिग गर्ल्स डोंट क्राय' ही वेब सीरिज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. नित्या मेहरा, सुधांशू सारिया, करण कपाडिया आणि कोपल नैथानी दिग्दर्शित ही वेब सीरिज १४ मार्च रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये पूजा भट्टसोबत रायमा सेन, अवंतिका वंदनपू, झोया हुसैन आणि मुकुल चड्डा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मैं अटल हूं

बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर आता 'मैं अटल हूं' हा चित्रपट ओटीटीवर देखील रिलीज होणार आहे. ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे याची माहिती दिली आहे. पंकज त्रिपाठीचा हा चित्रपट १४ मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, पीयूष मिश्रा, रमेश कुमार सेवक, दया शंकर पांडे, प्रमोद पाठक, पायल नायर, राजेश खत्री यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत.

लाल सलाम

रजनीकांत यांची कॅमिओ भूमिका असलेला ‘लाल सलाम’ हा चित्रपट देखील या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे. विष्णू विशाल, विक्रांत आणि सेन्थिल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून, हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. येत्या १५ मार्चपासून हा चित्रपट घरबसल्या पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel
विभाग