OTT Release : 'द स्टोरी टेलर' ते 'पुष्पा २', आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Release : 'द स्टोरी टेलर' ते 'पुष्पा २', आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी

OTT Release : 'द स्टोरी टेलर' ते 'पुष्पा २', आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी

Jan 28, 2025 09:24 AM IST

Upcoming OTT Release : या आठवड्यात म्हणजे २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'द स्टोरी टेलर' ते 'पुष्पा २', आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी
'द स्टोरी टेलर' ते 'पुष्पा २', आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी

OTT Release This Week : सध्या ओटीटीवर मनोरंजनाचा खजिना निर्माण झाला आहे. दर आठवड्याला वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. या आठवड्यात देखील प्रेक्षकांना असाच मनोरंजनाचा खजिना पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात म्हणजे २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी प्रेक्षकांना घरीच बसून काही जबरदस्त कंटेंट बघण्याची संधी मिळणार आहे. पाहा या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी...

द स्टोरी टेलर

राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर, अभिनेता परेश रावलचा चित्रपट 'द स्टोरी टेलर' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर आज म्हणजेच २८ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

द सीक्रेट ऑफ शिलेदार्स

राजीव खंडेलवाल यांच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'द सीक्रेट ऑफ शिलेदार्स'च्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ही धमाकेदार वेब सीरिज आता डिस्ने प्लस हॉटस्टारवर ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

रिक्रूट सीझन २

'रिक्रूट सीझन २' ही एक इंग्लिश स्पाय थ्रिलर वेब सीरिज आहे, जी ३० जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या मालिकेचा पहिला सीझन प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि आता सीझन २च्या ट्रेलरने आगामी सीझनसाठी प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

Rakhi Sawant : दादला माझा पाकिस्तानी! कोण आहे राखी सावंतचा नवा बॉयफ्रेंड डोडी खान?

आइडेंटिटी

या महिन्याच्या २ तारखेला म्हणजेच २ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि टोविनो थॉमस अभिनीत मल्याळम ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'आयडेंटिटी' आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म 'झी ५'वर प्रदर्शित होणार आहे.

यू आर कॉर्डिअली इनव्हायटेड

'यू आर कॉर्डिअली इनव्हायटेड' हा हॉलिवूडचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्याची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता हा चित्रपट ३० जानेवारीला प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

पुष्पा २

बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केल्यानंतर, सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ॲक्शन थ्रिलर 'पुष्पा २' अखेर ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अद्याप याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Whats_app_banner