ओटीटी विश्व म्हणजे अक्षरशः मनोरंजनाचा खजिनाच आहे. अनेक लोक घरी बसून छान ओटीटीवरचे काही चित्रपट एन्जॉय करताना दिसतात. अगदी जुन्या प्रसिद्ध चित्रपटांपासून ते काल-परवा आलेल्या चित्रपटापर्यंत सगळेच चित्रपट आता ओटीटीवर बघता येतात. तुम्ही देखील या आठवड्यात घरीच बसून काही चित्रपट बघण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
'एस्पिरेंट्स' हा सीरिज प्रचंड गाजली होती. या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सिझनमध्ये अभिलाष, गुरी आणि एसकेची कथा दाखवण्यात येणार आहे. ही सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
'दुरंगा 2' ही सायकोलॉजिकल ड्रामा वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये अमित गाध, गुलशन देवैया आणि दृष्टी धामी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज २४ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
परमपोरुल हा तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटात आर सरतकुमार, अमिताभ प्रधान, करिश्मा परदेशी आणि बालाजी शक्तिवेल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतचा 'चंद्रमुखी २' हा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २६ ऑक्टोबरला रिलिज होणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राघव लॉरेन्स मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा कॉफी विथ करण ८ हा शो २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या पहिल्या भागात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या