OTT Release This Week: उन्हाळा आणि सुट्टीचा हंगामा संपल्याने आता प्रेक्षक फारसे बाहेर पडून थिएटरकडे जाताना दिसणार नाहीत. घरातच बसून, छान पावसाळी वातावरणात घरच्या घरीच चित्रपट किंवा वेब सीरिज बघण्याला आता अधिक पसंती दिली जाईल. नेहमीप्रमाणेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात मनोरंजनाचा नवा खजिना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आठवड्यात तीन चर्चित वेब सीरिज अन् दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर बघूया यादी...
अभिनेत्री सुरभी ज्योती आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांची 'गुनाह' ही वेब सीरिज ३ जून रोजी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या वेब सीरिजमध्ये गश्मीर आणि सुरभीच्या केमिस्ट्रीसोबतच धमाकेदार ट्विस्टही पाहायला मिळणार आहेत.
'गुनाह' व्यतिरिक्त 'द लीजेंड ऑफ हनुमान सीझन ४' देखील डिस्ने प्लस हॉटस्टारवर धडकणार आहे. 'गुनाह' ही वेब सीरिज ३ जूनला रिलीज होणार आहे, तर 'द लीजेंड ऑफ हनुमान सीझन ४' येत्या ४ जूनपासून प्रसारित होणार आहे.
'गुलक' या सुपरहिट वेब सीरिजचा चौथा सीझनही या आठवड्यात ओटीटीवर दाखल होणार आहे. येत्या ७ जूनला संपूर्ण मिश्रा कुटुंब पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येणार आहे. मिश्रा कुटुंबाची कहाणी तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता.
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीचा 'ब्लॅकआउट' हा चित्रपट ७ जूनपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुनील ग्रोव्हर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. धोकादायक स्टंट आणि ॲक्शन असलेला हा चित्रपट ६ जूनला नेटफ्लिक्सवर धडकणार असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या