OTT Release: रितेश देशमुख ‘पील’ तर इमरान हाश्मीचा ‘शो टाईम’; या आठवड्यात ओटीटीवर होणार हंगामा!-ott release these week riteish deshmukh s pill and emraan hashmi s show time these movies and series releasing this week ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Release: रितेश देशमुख ‘पील’ तर इमरान हाश्मीचा ‘शो टाईम’; या आठवड्यात ओटीटीवर होणार हंगामा!

OTT Release: रितेश देशमुख ‘पील’ तर इमरान हाश्मीचा ‘शो टाईम’; या आठवड्यात ओटीटीवर होणार हंगामा!

Jul 08, 2024 06:49 PM IST

OTT Releases These Week: आता या आठवड्यात इमरान हाश्मी आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक स्टार्सचे चित्रपट आणि शो प्रदर्शित होणार आहेत, ज्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

या आठवड्यात ओटीटीवर होणार हंगामा!
या आठवड्यात ओटीटीवर होणार हंगामा!

OTT Releases These Week: ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्राईम, कॉमेडी, ड्रामासह अनेक शैलींचे चित्रपट आणि शो दर आठवड्याला प्रदर्शित होतात. जूनमध्ये रिलीज झालेल्या ‘पंचायत’च्या तिसऱ्या सीझनने खळबळ उडवून दिली होती आणि या आठवड्यात ‘मिर्झापूर ३’ देखील प्रदर्शित झाला. आता या आठवड्यात इमरान हाश्मी आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक स्टार्सचे चित्रपट आणि शो प्रदर्शित होणार आहेत, ज्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

कमांडर करण सक्सेना

टीव्हीचा 'राम' म्हणजेच गुरमीत चौधरी रॉ एजंट बनून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. त्याचा 'कमांडर करण सक्सेना' हा त्याचा शो ८ जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

एवा लास्टिंग २

‘एवा लास्टिंग २’ हा शो अवा समर नावाच्या मुलीवर आधारित आहे, जी तिच्या बुद्धिमत्तेमुळे तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये प्रसिद्ध आहे. अवा ही पहिली मुलगी आहे, जिला मुलांच्या शाळेत प्रवेश मिळतो. ड्रामा आणि कॉमेडीने भरलेल्या या शोचा पहिला सीझन हिट झाल्यानंतर आता दुसरा सीझन १० जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

Lakhat Ek Amcha Dada: ‘तुळजा’साठी लकी ठरली ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका! अभिनेत्री दिशा परदेशीने सांगितला भन्नाट किस्सा

वाईल्ड वाईल्ड पंजाब

'वाईल्ड वाईल्ड पंजाब' हा वरुण शर्मा, राजेश शर्मा, मनजोत सिंह आणि सनी सिंह यांचा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा पंजाबला गेलेल्या चार मित्रांवर आधारित आहे. इथे येताच त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात, ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल. हा चित्रपट १० जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

३६ डेज

’३६ डेज’ ही एका भाडेकरूची कथा आहे, जी तिच्या घरमालक आणि त्याच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालते. भाडेकरू घरात राहायला आल्यापासून काहीतरी विचित्र घडत आहे. यामध्ये नेहा शर्माने भाडेकरूची भूमिका साकारली आहे. ही सीरिज १२ जुलै रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होत आहे.

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात बॅन होणार विशाल पांडे; ‘वडापाव गर्ल’ चंद्रिकाने रचला नवा डाव

पील

'पील' हा रितेश देशमुखचा चित्रपट आहे, जो फार्मा उद्योगातील भ्रष्टाचार उघड करणार आहे. या चित्रपटात त्याने डॉक्टर प्रकाशची भूमिका साकारली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी माणसांना मारू शकणारे औषध तयार केले आहे, त्यांच्याविषयीचे सत्य समोर आणण्याचा तो प्रयत्न करताना दिसणार आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.

शो टाईम सीझन २

इमरान हाश्मी, महिमा मकवाना, मौनी रॉय स्टारर 'शो टाईम' या सीरिजचा सीझन २ रिलीज होणार आहे. हा शो ग्लॅमरस जगामागील सत्य दाखवतो. शक्ती आणि प्रसिद्धीसाठी कॅमेऱ्याच्या पलीकडे अभिनेत्याच्या आयुष्यात काय घडते ते यात दाखवले जाणार आहे. ही सीरिज १२ जुलै डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

काकुडा

'काकुडा' हा सोनाक्षी सिन्हाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे. हॉरर आणि कॉमेडीने भरलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता, ज्यामध्ये ‘काकुडा’ दर मंगळवारी संध्याकाळी ७.१५ वाजता येतो, त्याला येऊ दिले नाही तर तो मारतो, असे दाखवण्यात आले होते. हा चित्रपट १२ जुलै रोजी ‘झी ५’वर प्रदर्शित होत आहे.

Whats_app_banner
विभाग