OTT releases this week: आपल्यापैकी अनेक जण आठवड्याच्या शेवटाची आतुरतेने वाट बघत असतात. आठवड्याच्या शेवटी अनेक धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या वीकेंडला देखील ओटीटीवर अनेक नवे सिनेमे आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. चला तर, एक नजर टाकूया या आठवड्याच्या रिलीजवर…
कथानक : माध्यमिक शाळेतील शिक्षक हा शाळेतील अंतर्गत चौकशीचा विषय ठरतो. शाळेची प्रतिमा वाचवण्यासाठी तो एका मित्राची मदत घेतो.
कलाकार: ब्रायन जॉर्डन अल्वारेझ, स्टेफनी कोएनिग, एनरिको कोलांटोनी
जॉनर: कॉमेडी / ड्रामा
प्लॅटफॉर्म: डिस्ने + हॉटस्टार
रिलीज डेट: ३ सप्टेंबर
कथानक : समारंभाच्या काही वेळापूर्वी एखादा मृतदेह सापडल्याने सर्व पाहुणे संशयाच्या भोवऱ्यात सापडतात. यामुळे कथानकात अनेक ट्वीस्ट येतात.
कलाकार : निकोल किडमन, लीव श्रायबर, ईशान खट्टर
जॉनर: मिस्ट्री/क्राइम
प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
रिलीज डेट: ५ सप्टेंबर
कथानक : पंजाबमधील एका पुरुषाला हरयाणातील एका महिलेबद्दल भावना निर्माण होतात, जिची आवड कुस्तीमध्ये आहे. तिला इम्प्रेस करण्यासाठी तो तिच्या कुस्तीच्या वातावरणात स्वत:ला झोकून देतो.
कलाकार : एमी विर्क, सोनम बाजवा, योगराज सिंह
जॉनर: कॉमेडी/रोमान्स
प्लॅटफॉर्म: चौपाल
रिलीज डेट: ५ सप्टेंबर
कथानक : आपलं सगळं काही गमावूनही मुंबईच्या गजबजलेल्या न्यूजरूममधून काम करताना खंबीर राहणाऱ्या ‘बे’ची ही कथा आहे.
कलाकार : अनन्या पांडे, वीर दास, मिनी माथुर
जॉनर: कॉमेडी/ड्रामा
प्लॅटफॉर्म: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
रिलीज डेट: ६ सप्टेंबर
कथानक: नवी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेत दरोडेखोरांच्या टोळीशी कमांडोंचा एक गट भीषण संघर्ष करतो आणि त्याचे रूपांतर लढाईतच होते.
कलाकार : राघव जुयाल, लक्ष्य, तान्या माणिकतला
जॉनर: अॅक्शन/थ्रिलर
प्लॅटफॉर्म: डिस्ने+ हॉटस्टार
रिलीज डेट: ६ सप्टेंबर
कथानक: धोका जवळ आल्यावर कबीर पुन्हा सक्रिय झाला आहे. त्याला आणि त्याच्या वडिलांना लक्ष्य केल्यानंतर, आता कबीर खोऱ्यातील नवीन धोक्याचा सामना करण्यासाठी पुन्हा एसटीजीमध्ये सामील होणार आहे.
कलाकार : मानव विज, अरबाज खान, गौरव अरोरा
जॉनर: अॅक्शन/थ्रिलर
प्लॅटफॉर्म: सोनीलिव्ह
रिलीज डेट: ६ सप्टेंबर
कथानक: एका मुलाच्या अपहरणामुळे संवेदनशील घटनांची मालिका सुरू होते आणि शेवटी सगळ्यांच्या नशिबी दुर्दैव येते.
कलाकार : रितेश देशमुख, फरदीन खान, प्रिया बापट
जॉनर: क्राइम/थ्रिलर
प्लॅटफॉर्म: जिओसिनेमा
रिलीज डेट: ६ सप्टेंबर
कथानक: मियामीचे दोन विनोदी गुप्तहेर आपला माजी पोलिस कॅप्टन ड्रग्ज कार्टेलशी संबंधित असल्याचे लक्षात आल्यानंतर तो निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याच्या आशेने धोकादायक प्रवासाला निघतात.
कलाकार: विल स्मिथ, मार्टिन लॉरेन्स, वेनेसा हडगेन्स
जॉनर: अॅक्शन / कॉमेडी
प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
रिलीज डेट: ६ सप्टेंबर
कथानक : गर्दीच्या बसस्थानकात वेगवेगळ्या क्षेत्रातील दोन माणसे भेटतात. एक श्रीमंत आहे तर, दुसऱ्याला अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यांचा सामायिक प्रवास विनोदी आणि आश्चर्यकारक घटनांनी भरलेला असतो.
कलाकार : आसिफ अली, अनघा, सौबिन शाहीर
जॉनर: कॉमेडी/ड्रामा
प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
रिलीज डेट: ६ सप्टेंबर
कथानक: एक अमेरिकन नन इटलीच्या ग्रामीण भागातील एका निर्जन कॉन्व्हेंटमध्ये सामील होऊन नव्याने सुरुवात करते. इथे येताच तिचे सुरुवातीला चांगले स्वागत होते. मात्र, हळूहळू विदारक गुपिते उलगडत जातात.
स्टार्स: सिडनी स्वीनी, बेनेडेट्टा पोरकारोली, अल्वारो मोर्टे
जॉनर: हॉरर / मिस्ट्री
प्लॅटफॉर्म: जिओ सिनेमा
रिलीज डेट: ६ सप्टेंबर