Ott Releases: वीकेंडला घरी आहात? घरबसल्या ओटीटीवर पाहा ‘हे’ चित्रपट
Ott Releases This Week: या आठवड्यात विकेंडला ओटीटीवर कोणते नवे चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार हे जाणून घेऊया...
करोना काळानंतर अनेक प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट पाहण्यास कंटाळा येतो. ते घरबसल्या चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करतात. प्रेक्षकांची ही मागणी पाहाता नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिज्नी+हॉटस्टार, झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मने वेगवेगळ्या कथा पाहायला मिळतात. आता या आठवड्यात कोणते नवे चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत हे जाणून घ्या...
ट्रेंडिंग न्यूज
जाने जान (Jaane Jaan)
अभिनेत्री करीना कपूर खान ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत असलेला 'जाने जान' हा चित्रपट २१ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता विजय वर्माने देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा: “नेमकं काय रिकामं आहे? नरेंद्र मोदींचं डोकं की…”, पुन्हा एकदा प्रकाश राज यांनी साधला मोदींवर निशाणा
लव्ह अगेन (Love Again)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि सॅम ह्यूघन महत्त्वाच्या भूमिकेत असणारा लव्ह अगेन हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सोफी क्रेमरच्या कादंबरीवर आधारित आहे. तसेच 'SMS für Dich' या जर्मन चित्रपटाचा रिमेक आहे. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
फास्ट एक्स (Fast X)
फास्ट एक्स हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. मिशेल रॉड्रिग्ज, जेसन स्टॅथम, टायरेस गिब्सन, जेसन मोमोआ, जॉन सीना, जॉर्डाना ब्रेवस्टर, नॅथली इमॅन्युएल, सुंग कांग, ब्री लार्सन, डॅनिएला मेल्चियर, अॅलन रिचसन, स्कॉट ईस्टवुड, हेलन मिरेन, चार्लीझ थेरॉन, आणि रिच मोरेनो हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.
किंग ऑफ कोथा (King of Kotha)
अभिनेता दुलकर सलमान महत्त्वाच्या भूमिकेत असणारा किंग ऑफ कोथा हा चित्रपट २४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
विभाग