OTT Hightes Paid Actress: बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर गेली २४ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच ओटीटी विश्वात पदार्पण केले. तिने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात काम केले. या चित्रपटासाठी तिने तगडे मानधन देखील घेतले. तिने घेतलेले मानधन हे आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन होते. त्यामुळे आता ही अभिनेत्री कोण? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आहे. करीनाने नुकताच ओटीटीवर पदार्पण केले आहे. तिचा 'जाने जा' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा ठरला आहे. या चित्रपटात करीनासोबत जयदीप अहलावत आणि विजय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटासाठी करीनाने घेतले सर्वाधिक मानधन. त्यामुळे ती ओटीटीसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
वाचा: निधनाच्या स्टंटमुळे पूनम पांडेला मोठा झटका, नेमकं काय झालं जाणून घ्या
करीनाने यापूर्वी लाल सिंह चड्ढा या चित्रपटात काम केले. या चित्रपटासाठी तिने जवळपास ८ कोटी रुपये मानधन घेतले. त्यानंतर ओटीटी डेब्यू साठी करीनाने १० ते १२ कोटी रुपये मानधन घेतले. या चित्रपटासाठी करीनाने घेतलेल्या मानधानमुळे विशेष चर्चा रंगल्या होत्या. या चित्रपटाला सर्वाधिक रेटिंग मिळाले होते.
जाने जा हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर आहे. या चित्रपटात सिंगल मदर असलेल्या आई आणि मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. माया डिसूजा ही भूमिका करीनाने साकारली आहे. माया ही तिचा पूर्व पती अजीत म्हात्रेची हत्या करते आणि शेजारी राहणाऱ्या जयदीप अहलावत यांना सांगते. आता करीनाचे भांड फुटतं का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
संबंधित बातम्या