OTT Binge Watch: आयएमडीबीवर तुफान लोकप्रियता मिळवतायत ‘या’ वेब सीरिज! तुम्ही पाहिल्यात का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Binge Watch: आयएमडीबीवर तुफान लोकप्रियता मिळवतायत ‘या’ वेब सीरिज! तुम्ही पाहिल्यात का?

OTT Binge Watch: आयएमडीबीवर तुफान लोकप्रियता मिळवतायत ‘या’ वेब सीरिज! तुम्ही पाहिल्यात का?

Published Oct 04, 2023 10:58 AM IST

OTT Binge Watch Web Series: आज आम्ही तुम्हाला अशा काही वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्यांना IMDbवर सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे.

OTT Binge Watch Web Series
OTT Binge Watch Web Series

OTT Binge Watch Web Series: ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अनेक वेब सीरिज उपलब्ध आहेत. अनेक जॉनरच्या सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पण, आज आम्ही तुम्हाला अशा काही वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्यांना IMDb वर सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. या आयएमडीबीच्या टॉप ५ वेब सीरिज आहेत. तुम्ही येत्या वीकेंडला तुमच्या मित्रांसोबत नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह किंवा यूट्यूबवर वेब सीरिज पाहण्याचा विचार करत असाल, तर ही यादी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते.

स्कॅम १९९२: द हर्षदा मेहता स्टोरी

हर्षद मेहता याच्या जीवनावर आधारित 'स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी'ला IMDb वर ९.३ रेटिंग मिळाले आहे. सोनी लिव्हच्या या वेब सीरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत झळकला आहे. या वेब सीरिजमध्ये एका सामान्य गुजराती कुटुंबातील मुलाची कथा दाखवली आहे, जो शेअर मार्केटच्या दुनियेत आपला दबदबा निर्माण करतो.

अ‍ॅस्पिरंट्स

‘अ‍ॅस्पिरंट्स’ ही सीरिज सध्या युट्यूबवर बघता येत आहेत. या सीरिजला IMDb वर ९.२ रेटिंग मिळाले आहे. या वेब सीरिजमध्ये युपीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा दाखवण्यात आली आहे. वेगवेगळ्या पात्रांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येणाऱ्या विविध समस्या यात मांडण्यात आल्या आहेत.

Ramayana: रणबीरच्या ‘रामायण’मधून आलिया आऊट; आता ‘या’ प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीची लागली वर्णी!

टीव्हीएफ पिचर्स

‘टीव्हीएफ पिचर्स’चा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सीरिजचे दोन्ही सीझन ‘झी५’वर स्ट्रिम होत आहेत. IMDb वर या सीरिजला ९.१ रेटिंग मिळाले आहे. या वेब सीरिजमध्ये स्टार्टअप्स आणि त्यांच्या निधीशी संबंधित कथा दाखवण्यात आली आहे. स्टार्टअप्सना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते, यावर ही सीरिज भाष्य करते.

कोटा फॅक्टरी

नेटफ्लिक्सच्या 'कोटा फॅक्टरी' या वेब सीरिजचे दोन सीझन आले आहेत. लवकरच तिसरा सीझन देखील येणार आहे. या सीरिजला IMDb वर ९ रेटिंग मिळाले आहे. ही संपूर्ण वेब सीरिज ब्लॅक अँड व्हाईट आहे. दिग्दर्शकाने ठरवून काही गोष्टी या वेब सीरिजमध्ये मांडल्या आहेत. कोटा येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील रंगहीन, कंटाळवाणे, निराशाजनक पैलू यातून अधिक ठळकपणे दिसले आहेत.

रॉकेट बॉईज

‘रॉकेट बॉईज’ या गाजलेल्या सीरिजचेही दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सोनी लाईव्हच्या या वेब सीरिजमध्ये होमी जहांगीर भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे. या सीरिजला IMDb वर ८.९ रेटिंग मिळाले आहे.

Whats_app_banner