OTT Binge Watch Sports Drama: बॉलिवूडमध्ये बायोपिक आणि इतर चित्रपटांचा बराच बोलबाला आहे. ज्याप्रमाणे रोमँटिक चित्रपट लोक आवडीने पाहतात, त्याचप्रमाणे स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट देखील उत्सुकतेने पाहिले जातात. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे एखाद्या खेळाडूच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण अवघ्या जगासमोर मांडतात. आज आपण असेच काही चित्रपट बघणार आहोत, जे खेळावर आधारित सत्य घटनांवर आधारित आहेत. असे आयकॉनिक चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकणार आहात.
अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ ही एक प्रेरणादायी कथा आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता, पण बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू दाखवू शकला नाही. ‘झुंड’मध्ये अमिताभ बच्चन क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेत दिसले होते. विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात त्यांची कारकीर्द दाखवण्यात आली आहे. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांचे कलागुण ओळखून त्यांना फुटबॉलचे प्रशिक्षिण दिले होते. हा चित्रपट ‘झी ५’वर उपलब्ध आहे.
या चित्रपटाची कथा १९८३च्या क्रिकेट विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित होती. या चित्रपटात १९८३चा संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ‘८३’मध्ये रणवीर सिंह याने प्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर, दीपिका पदुकोणने त्यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारली आहे. ‘८३’ हा चित्रपट डिस्ने हॉट स्टारवर बघता येऊ शकतो.
हरियाणा हा देशाचा असा भाग आहे, जिथून जास्तीत जास्त खेळाडू येतात आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकतात. ‘दंगल’मध्येही अशीच कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटात हरियाणातील कुस्तीपटू बहिणींची खरी कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांनी भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेतले. या चित्रपटात आमिर खान, फातिमा सना शेख, झायरा वसीम, साक्षी तन्वर आणि सान्या मल्होत्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.
‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट 'फ्लाइंग सिख' या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंह यांची कथा आहे. या चित्रपटात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसला होता. मिल्खा सिंह या देशसेवेच्या इच्छेने सैन्यात भरती झालेल्या मुलाची कहाणी दाखवण्यात आली आहे. धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी देशाची मान अभिमानाने उंचावली होती. ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट डिस्ने हॉट स्टारवर बघता येऊ शकतो.
‘पान सिंग तोमर’ या चित्रपटात दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. तिग्मांशू धुलिया यांनी पान सिंग तोमरला पूर्ण प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न केला आहे, जो पडद्यावर स्पष्टपणे दिसून येतो. हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावरील अॅथलीट बनलेला डाकू पानसिंग तोमरच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या