Filmfare Award Winning Web Series: नुकताच मुंबईत फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक वेब सीरिजनी पुरस्कार पटकावले आहेत. या पुरस्कार सोहळ्यात 'स्कूप', 'ज्युबिली' आणि 'कोहरा' या वेब सीरिजचा दबदबा पाहायला मिळाला आहे. या सीरिजना सर्वाधिक पुरस्कार मिळाले. तुम्ही देखील या पुरस्कार विजेत्या वेब सीरिज आवर्जून बघितल्या पाहिजेत. जाणून घ्या कुठे पाहता येतील...
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेल्या 'ज्युबिली' या वेब सीरिजने 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड' सोहळ्यात ९ पुरस्कार जिंकले आहेत. ४०-५०च्या दशकातील हिंदी चित्रपट विश्वावर आधारित या वेब सीरिजमध्ये अभिनेता अपारशक्ती खुराना, अभिनेत्री अदिती राव हैदरी यांच्यासोबत प्रसेनजीत चॅटर्जी, सिद्धांत गुप्ता आणि वामिका गब्बी यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
'कोहरा' ही क्राईम थ्रिलर वेब सीरिज रिलीज झाल्यापासून बराच काळ टॉप-१०च्या ट्रेंडमध्ये राहिली होती. सहा भागांच्या या सीरिजमध्ये बरुण सोबती आणि सुविंदर विकी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या वेब सीरिजने एकूण पाच पुरस्कार पटकावले आहेत. 'कोहरा'ची कथा एका एनआरआयच्या हत्येभोवती फिरते. ही सीरिज नेटफ्लिक्सवर हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषांमध्ये पाहता येईल.
दहा भागांच्या या वेब सीरिजसाठी अभिषेक बॅनर्जीला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'द ग्रेट वेडिंग्स ऑफ मुनेस' ही सीरिज वूटवर बघण्यासाठी उपलब्ध आहे.
'दिल्ली क्राईम सीझन २' ही नेटफ्लिक्सवरची सर्वात लोकप्रिय वेब सीरिज आहे. पहिल्या सीझनच्या यशानंतर, निर्मात्यांनी त्याचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सीझनलाही प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. शेफाली शाह, रसिका दुग्गल, तिलोत्तमा शोम आणि राजेश तैलंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या 'दहाड' या क्राईम थ्रिलर सीरिजसाठी विजय वर्माला सर्वोत्कृष्ट अभिनेता (ज्युरी) आणि सोनाक्षी सिन्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आला. 'दहाड' या सीरिजमधून सोनाक्षी सिन्हाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले.
संबंधित बातम्या