Laapataa Ladies : मोठा धक्का! आमिर खान-किरण रावचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Laapataa Ladies : मोठा धक्का! आमिर खान-किरण रावचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

Laapataa Ladies : मोठा धक्का! आमिर खान-किरण रावचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

Dec 18, 2024 02:30 PM IST

Laapataa Ladies Oscar 2025 : आमिर खानच्या प्रॉडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले होते. दिग्दर्शक म्हणून किरणचा हा दुसरा चित्रपट आहे, ज्याला समीक्षकांचाच नव्हे तर प्रेक्षकांचाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

लापता लेडीज
लापता लेडीज

Laapataa Ladies Oscar 2025 : किरण रावचा 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर कॅटेगरीच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवू शकला नाही. मात्र, ब्रिटनमधील आणि भारतीय कलाकार असलेल्या 'संतोष' या भारताशी संबंधित दुसऱ्या चित्रपटाची शॉर्टलिस्टमध्ये निवड करण्यात आली आहे. केवळ किरण आणि आमिर खानच नाही तर संपूर्ण देश ही बातमी ऐकून खूप निराश झाला आहे.  प्रत्येकजण या चित्रपटाची ऑस्करमध्ये निवड व्हावी यासाठी प्रार्थना करत होता. मात्र, आता सगळेच निराश झाले आहेत.

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ९७व्याऑस्कर पुरस्कारांच्या अधिकृत प्रवेशासाठी ‘लापता लेडीज’ची निवड करण्यात आली होती. आसामी चित्रपट निर्माते जाहनू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील १३ सदस्यीय निवड समितीने म्हटले होते की, किरणच्या या चित्रपटाने भारतीय महिलांची कोंडी चांगल्या प्रकारे दाखवली आहे.

काय होती चित्रपटाची कथा?

लापता लेडीज’ची कथा ही अगदी हलकीफुलकी होती. एका चांगल्या कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अतिशय वेगळा विषय दाखवण्यात आला होता. ही कथा २००१मध्ये निर्मल प्रदेश नावाच्या एका काल्पनिक राज्यावर आधारित आहे, जिथे २ नववधू ट्रेनमध्ये बदलतात. जिथे एकीला दुसरा नवरदेव घेऊन जातो. तर, त्याचवेळी एक नववधू वेगळ्याच स्थानकात दुसऱ्याच पुरुषासोबत उतरते. यानंतर एक पोलीस अधिकारी हे प्रकरण हाताळतो आणि मग दोन्ही मुली आपापल्या ठिकाणी परत जातात.

Tejashri Pradhan : हो मला आता लग्न करायचं आहे! तेजश्री प्रधानला पुन्हा थाटायचाय संसार; मग अडतंय कुठं?

किरण दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली होती. या चित्रपटात नितंशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ऑस्करमध्ये आपले स्थान निर्माण करेल, अशी आमिर आणि किरण यांना खूप आशा होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने किरणला सच्चा दिग्दर्शक म्हटले होते. केवळ किरणच हा चित्रपट इतका चांगला बनवू शकतो, हे आपल्याला माहित होते, असे तो म्हणाला.

ओटीटीवर घातला धुमाकूळ!

चित्रपटगृहात ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण, ओटीटीवर चित्रपट येताच धमाका झाला आणि लोकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. प्रतिभा रांटा, नितांशी गोयल आणि स्पर्श श्रीवास्तव या कलाकारांनी चित्रपटात अप्रतिम काम केले आहे. चित्रपटात रवी किशन, छाया कदम आणि सतेंद्र सोनी हे कलाकार देखील सहाय्यक भूमिकेत दिसले होते.

Whats_app_banner